Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 02:18 PM2022-09-09T14:18:54+5:302022-09-09T14:19:43+5:30
Tata Tiago EV : जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त Tiago EV ची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक कार टियागो (Tiago EV) असणार आहे. कंपनीने याबाबत खुलासा केला आहे. Tiago EV सर्वात आधी ऑटो एक्सपो 2018 (Auto Expo 2018) मध्ये शोकेस करण्यात आला होती, मात्र कंपनीने कार लाँच केली नाही. त्याऐवजी टाटा मोटर्सने Nexon EV, Nexon EV Max आणि Tigor EV लाँच केली आहे. आता जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त Tiago EV ची घोषणा करण्यात आली आहे.
आतापर्यंत कंपनीकडून Tiago EV बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाँच झाल्यावर Tiago EV ही टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाटा मोटर्सजवळ सध्या एक ईव्ही पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दिशेने 3 फेस्ड अप्रोच आहे. ईव्ही कंपनीला अनेक सेगमेंट, बॉडी स्टाइल आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये लाँच करायची आहे.
कंपनीकडे आधीपासूनच टिगोर ईव्ही (Tigor EV) आहे, जी कॉम्पॅक्ट सेडान आहे आणि नेक्सॉन ईव्ही (Nexon EV ) जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. आगामी Tiago EV ही हॅचबॅक असणार आहे. टाटा मोटर्स कंपनी Ziptron टेक्नॉलॉजी Tiago EV साठी वापरेल, जी Tigor EV आणि Nexon EV साठी वापरत असल्याची शक्यता आहे. Ziptron टेक्नॉलॉजी Xpres-T टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक अॅडव्हान्स आहे, जी पूर्वी Tigor EV साठी वापरली जात होती, जी कमर्शियल सेगमेंटमध्ये होती.
कॉस्मेटिकदृष्ट्या, Tiago EV आणि नियमित Tiago मध्ये कोणताही मोठा फरक असणार नाही. Tiago EV ला सिग्नेचर टील ब्लू आणि डेटोना ग्रे मध्ये ऑफर केले जावे. संपूर्ण एक्सटीरिअरसोबत इंटीरिअरमध्ये सुद्धा ब्लू एक्सेंट असतील. टाटा मोटर्सने शुक्रवारी जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त सांगितले की, Tiago EV हे Nexon आणि Tigor नंतर इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कंपनीचे तिसरे उत्पादन असेल.
येत्या आठवड्यात किंमत जाहीर होण्याची शक्यता
"आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही Tiago EV सह आमच्या ईव्ही सेगमेंटच्या विस्ताराची घोषणा करत आहोत", असे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीची Tiago EV ची किंमत आणि इतर फीचर्स येत्या आठवड्यात जारी करण्याची योजना आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर Tigor EV वरून घेतले जाऊ शकते. हे सामान्य इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसारखे दिसते, परंतु ईव्ही संबंधित माहिती दाखवण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे.