टाटाची 'ही' कार फक्त 1100 रुपयांत धावेल 1000 किमी, या तारखेपासून सुरू होणार बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 08:11 PM2022-10-08T20:11:58+5:302022-10-08T20:15:53+5:30

Tiago EV : ही टाटा मोर्टर्सची (Tata Motors)तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.

tata tiago ev will run 1000 km for just rs 1100 rupees booking starts from october 10  | टाटाची 'ही' कार फक्त 1100 रुपयांत धावेल 1000 किमी, या तारखेपासून सुरू होणार बुकिंग!

टाटाची 'ही' कार फक्त 1100 रुपयांत धावेल 1000 किमी, या तारखेपासून सुरू होणार बुकिंग!

Next

नवी दिल्ली : टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्हीचे (Tiago EV) बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कंपनीकडून या कारबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्स या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. Tiago EV ही टाटा मोर्टर्सची (Tata Motors)तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.

कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि टिगोर ईव्ही (Tigor EV) यांचा समावेश आहे. कंपनीने Tiago EV सह इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहे. टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार चालवल्याने 6.5 रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. यासाठी कंपनीने तुलनात्मक डेटाही सादर केला.

टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही या रेंजची पेट्रोल कार चालवत असाल तर हजार किलोमीटर चालवण्यासाठी तुम्हाला 7,500 रुपयांचे पेट्रोल लागेल. त्याचवेळी, Tiago EV ही कार 1000 किमी चालवल्यावर फक्त 1,100 रुपये खर्च येईल. अशाप्रकारे, समतुल्य पेट्रोल कारच्या तुलनेत तुम्ही 1000 किमी चालवून जवळपास 6,500 रुपये वाचवू शकता.

कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू
Tiago EV चे बुकिंग 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिप किंवा वेबसाइटवर 21,000 रुपयांची टोकन रक्कम जमा करून Tiago EV कार बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. Tiago EV डिसेंबरपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असणार आहे. Tiago EV ही कार Ziptron टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. Tata Tiago EV ची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

24kWh बॅटरी पॅक यासह अनेक चार्जिंग ऑप्शन
ग्राहकांच्या विविध गरजा समजून घेऊन, Tiago EV मध्ये IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि 24kWh बॅटरी पॅक यासह अनेक चार्जिंग ऑप्शन देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, Tiago EV मध्ये 24kWh बॅटरी पॅकसह 315 किमीची रेंज असणार आहे. टाटा मोटर्सने 19.2kWh च्या बॅटरी पॅकसह Tiago EV सादर केली आहे. या बॅटरी पॅकसह कारची रेंज 250 किमी असल्याचे सांगितले जाते. तसेच, मोटर आणि बॅटरी 8 वर्षे किंवा 1,60,000 किलोमीटरच्या वॉरंटीसह येईल, असे कंपनीने सांगितले आहे

बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षम
याचबरोबर, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि इनसाइट्सच्या आधारे, 24kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटला उत्पादन आघाडीवर प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षम आहेत. ते DC फास्ट चार्जर वापरून सुमारे 57 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. यामध्ये हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, टीपीएमएस, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-मोड रीजन फीचरसह देखील दिले जात आहे, असे 
कंपनीने म्हटले आहे. 

Web Title: tata tiago ev will run 1000 km for just rs 1100 rupees booking starts from october 10 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.