'या' स्वस्त  CNG कारमध्ये मिळतील शानदार फीचर्स; i10 आणि Swift ला देतेय टक्कर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:04 PM2022-11-28T18:04:46+5:302022-11-28T18:05:27+5:30

tata tiago nrg cng : आतापर्यंत कंपनीने विक्रीचे कोणतेही आकडे शेअर केलेले नाहीत, परंतु एका रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या कारला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

tata tiago nrg cng maruti suzuki swift cng hyundai grand i10 nios cng pirce  | 'या' स्वस्त  CNG कारमध्ये मिळतील शानदार फीचर्स; i10 आणि Swift ला देतेय टक्कर! 

'या' स्वस्त  CNG कारमध्ये मिळतील शानदार फीचर्स; i10 आणि Swift ला देतेय टक्कर! 

googlenewsNext

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने नुकतेच टियागो एनआरजीचे (Tiago NRG) सीएनजी (CNG) व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत लाँच केले. नवीन Tata Tiago NRG CNG भारतात 7.40 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला Tiago आणि Tigor CNG लाँच केल्यानंतर टाटा मोटर्सच्या भारतीय पोर्टफोलिओमधील ही तिसरी सीएनजी कार आहे.

Tiago NRG चे सीएनजी मॉडेल सध्या खूप पसंत केले जात आहे. मात्र, आतापर्यंत कंपनीने विक्रीचे कोणतेही आकडे शेअर केलेले नाहीत, परंतु एका रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या कारला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे ही कार अनेक मॉडर्न फीचर्स आहेत. ही हॅचबॅक सेगमेंटमध्ये Hyundai i10 आणि Maruti Suzuki Swift ला टक्कर देत आहे.

शानदार फीचर्स
कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर Tata Tiago NRG च्या सीएनजी मॉडेलचे डिझाइन अगदी पेट्रोल मॉडेलसारखे आहे. नवीन कारमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्रॉस-हॅचमध्ये हाय ग्राउंड क्लीयरन्स, खडबडीत बॉडी क्लेडिंग, रुफ रेल्ससह ड्युअल-टोन रुफ आणि चारकोल ब्लॅक इंटीरियर आहे. याशिवाय Tiago NRG मध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स इत्यादी लक्झरी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

पॉवरफूल इंजिन
सीएनजी कारमध्ये 1.2-लिटर, तीन-सिलिंडर पेट्रोल इंजिन वापरले जाते, जे Tiago आणि Tigor सीएनजीमध्ये काम करते. हे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 84 बीएचपी आणि 113 एनएम आणि सीएनजी मोडमध्ये 72 बीएचपी आणि 95 एनएम निर्मिती करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याची इंधन कार्यक्षमता अद्याप समोर आलेली नाही.

जाणून घ्या किंमत?
टाटा मोटर्स Tiago NRG सीएनजी दोन व्हेरिएंट XT आणि XZ मध्ये विकत आहे. ज्यांच्या किंमती 7.40 लाख ते 7.80 लाख रुपये, एक्स-शोरूम आहेत. या कारची स्पर्धा मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी आणि ह्युंदाई ग्रँड i10 निओस सीएनजी इत्यादींसोबत होईल. जर तुम्ही नवीन सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तीनपैकी कोणतीही कार निवडू शकता. तिन्हींची किंमत जवळपास समान आहे.

Web Title: tata tiago nrg cng maruti suzuki swift cng hyundai grand i10 nios cng pirce 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.