TATA: टाटा पुन्हा रिलाँच करणार बंद केलेली कार; 2020 मध्ये अचानक उत्पादन थांबवलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:53 PM2021-07-28T16:53:20+5:302021-07-28T16:57:01+5:30

Tata Motors Tiago NRG: टाटा मोटर्स पुढील आठवड्यात हॅचबॅक कार लाँच करणार आहे. याची इन्व्हीटेशन पाठविण्यात आली आहेत. 

Tata Tiago NRG launch: Tata to relaunch discontinued car Tiago NRG on 4 April 2021 | TATA: टाटा पुन्हा रिलाँच करणार बंद केलेली कार; 2020 मध्ये अचानक उत्पादन थांबवलेले

TATA: टाटा पुन्हा रिलाँच करणार बंद केलेली कार; 2020 मध्ये अचानक उत्पादन थांबवलेले

Next

Tata Motors आपली हॅचबॅक कार Tiago ची लाईन अप वाढवत आहे. कंपनी पुढील आठवड्यात 4 ऑगस्टला टियागोचे बंद केलेले मॉडेल Tiago NRG अपग्रेड करून लाँच करणार आहे. टियागोची सीएनजी देखील लवकरच येणार आहे. (Tata Tiago NRG relaunch soon in India.)

Honda Amaze: अमेझिंग! CNG कारच्या स्पर्धेत आणखी एक बडी कंपनी उतरणार; मारुतीच्या डिझायरला टक्कर देणार

येत्या 4 ऑगस्टला टाटा मोटर्स टियागो एनआरजी (Tiago NRG) लाँच करणार आहे. कंपनीच्या हॅचबॅक मॉडेलची विक्री 2018 ते 2020 पर्यंत सुरु होती. मात्र जानेवारी 2020 मध्ये कंपनीने Tata Tiago ची फेसलिफ्ट लाँच केल्यावर हे मॉडेल बंद केले होते. आता पुन्हा हे मॉडेल बाजारात उतरवले जाणार आहे. 

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

Tiago NRG मध्ये टियागो सारखेच फिचर असणार आहेत. यामध्ये ग्रिल, हेडलँपसह मस्क्युलर बंपर, फॉक्स स्किड प्लेट्स, बॉडी क्लॅडिंग आणि रुफ रेल्स देखील आहेत. याशिवाय NRG मध्ये नवीन अलॉय व्हील्स देखील असण्याची शक्यता आहे. 

Tiago NRG मध्ये इंन्फोटेन्मेंट टचस्क्रीन असू शकते. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोचा पर्यायही असणार आहे. सोबतच फुल्ली अॅटोमॅटीक टेंपरेचर कंट्रोल, मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील, ड्युअल एअरबॅग, एबीएस आणि पार्किंग असिस्ट रीअर कॅमेरा असणार आहे. याचसोबत ओव्हरस्पीड अलर्ट, सीटबेल्ट रिमाईंडर सारखे फीचर असणार आहेत. 

TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट

या कारमध्ये रिव्होट्रॉन 1.2 लीटरचे तीन सिलिंडरचे इंजिन असणार आहे. हे इंजिन 86 हॉर्स पॉवरची ताकद आणि  113Nm  टॉर्क देणार आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड ऑटो ट्रान्समिशन असेल, अशी अपेक्षा आहे. या कारची किंमत 6 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. टाटाने यंदा Tiago XTA व्हर्जन लाँच केले आहे. याची किंमत 6.14 लाखांपासून सुरु होते.

Web Title: Tata Tiago NRG launch: Tata to relaunch discontinued car Tiago NRG on 4 April 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.