Tata कडून 6.42 लाख किमतीची नवीन कार लाँच; दमदार फीचर्स मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 02:38 PM2022-08-03T14:38:22+5:302022-08-03T14:39:15+5:30

Tata Tiago NRG XT variant:  टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोचे NRG व्हर्जन सादर केले होते. हे खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. 

tata tiago nrg xt variant launched in india know features and price details  | Tata कडून 6.42 लाख किमतीची नवीन कार लाँच; दमदार फीचर्स मिळणार!

Tata कडून 6.42 लाख किमतीची नवीन कार लाँच; दमदार फीचर्स मिळणार!

Next

टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या हॅचबॅक कार Tiago NRG चे नवीन XT व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने Tata Tiago NRG XT व्हेरिएंटची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोचे NRG व्हर्जन सादर केले होते. हे खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. 

आता एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने या कारचे नवीन व्हेरिएंट सादर केले आहे. टाटाने  फेसलिफ्ट Tiago NRG ला ऑगस्ट 2021 मध्ये  पुन्हा लाँच केले होते आणि ते फक्त पूर्णपणे लोडेड XZ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. आता एक नवीन परवडणारे व्हर्जन आहे, जे किंमत जवळपास 40,000 रुपयांपर्यंत खाली आणते.

असे आहेत XT व्हेरिएंटचे फीचर्स...
Tiago NRG ने आपल्या नवीन XT व्हेरिएंटमध्ये 14-इंच हायपरस्टाईल व्हील, 3.5-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फ्रंट फॉग लॅम्प यांसारखी फीचर्स दिली आहेत. याशिवाय, 'रेग्युलर' टियागोच्या XT व्हेरिएंटला देखील 14-इंच हायपरस्टाईल व्हील, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि रिअर पार्सल शेल्फ सारख्या फीचर्ससह अपडेट केले आहे.

Tiago NRG आपल्या साइड क्लॅडिंग, ब्लॅक रुफ रेल, चारकोल ब्लॅक इंटीरियर कलर स्कीम आणि 181 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह अधिक तरुणांना आकर्षित करेल. हे साधारण टियागोपेक्षा 37 मिमी लांब आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 1.2-लिटर, नॅच्युरली एस्पिरेटेड, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 84 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअलसह 5-स्पीड एएमटीशी जोडलेले आहे.

नवीन Tata Tiago NRG XT व्हेरिएंटमध्ये ब्लॅक-आउट बी-पिलर, रिअर पार्सल शेल्फ, पॅसेंजरच्या बाजूला व्हॅनिटी मिरर आहेत. Tiago NRG गेल्या वर्षी सादर करण्यात आली होती. याला ऑगस्ट 2021 मध्ये अपडेट मिळाले होते. नेहमीच्या टियागोच्या तुलनेत यामध्ये शार्प हेडलॅम्प आणि वेगळ्या पद्धतीने डिझाइन केलेली ग्रिल मिळते. या कारचे पुढील आणि मागील बंपर देखील वेगळे दिसतात.

Web Title: tata tiago nrg xt variant launched in india know features and price details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.