TATA मारुती, ह्युंदाईला टक्कर देणार; लोकप्रिय Tiago सीएनजीमध्ये येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:49 PM2021-05-12T12:49:57+5:302021-05-12T12:52:11+5:30

Tata Tiago Cng variant: टाटा टियागोची हॅचबॅक कार सध्या 9 व्हेरिअंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये 4 ट्रीम XE, XT, XZ आणि XZ+ आहेत. यापैकी एक किंवा दोन ट्रीममध्ये सीएनजी दिला जाणार आहे.

TATA Tiago will come in CNG; spotted testing In India, will hit maruti, hyundai | TATA मारुती, ह्युंदाईला टक्कर देणार; लोकप्रिय Tiago सीएनजीमध्ये येणार

TATA मारुती, ह्युंदाईला टक्कर देणार; लोकप्रिय Tiago सीएनजीमध्ये येणार

googlenewsNext

पेट्रोल किंमती पुन्हा एकदा शंभरी पार (petrol diesel Price hike) गेल्या आहेत. अनेक ठिकाणी 99 च्या आकड्यावर आहेत. अशावेळी मारुतीसह काही कंपन्यांनी डिझेल कार बंद केल्याने पेट्रोलचीकार घेणे परवडणारे नाहीय. मारुतीच्या ताफ्यात एकसोएक सीएनजी कार (Affordable CNG cars) आहेत. आता टाटा मोटर्सदेखील भारतीय बाजारात सीएनजी कार लाँच करणार आहे. टाटा त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार TaTa Tiago (टियागो) सीएनजीमध्ये आणणार आहे. भविष्यात टिगॉर या सेदान कारलादेखील सीएनजीमध्य़े टाटा लाँच  करण्याची शक्यता आहे. (Tata Tiago CNG Variant Spotted Testing.) 


टाटाच्या टियागो कारला सीएनजी किट व्हेरिअंटला टेस्टिंगवेळा पाहण्यात आले आहे. लुकमध्ये काही बदल नसले तरी देखील ही कार पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे परवडणारी ठरणार आहे. टाटाच्या या कराने कंपनीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस दाखविले होते. ( Tata Motors is working on the CNG models of Tiago and Tigor for the Indian market)


टियागो सीएनजीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. कारच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरून ही कार मधल्या व्हेरिअंटची आहे. लाल रंगातील हे फोटो व्हायरल झाले आहेत. पुढे सीएनजीचा स्टीकर लावलेला आहे. कारला नवे मल्टी स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. कारच्या फ्रंट ग्रीलमध्ये ट्राइ-एरो थीम देण्यात आले आहे. 
कारमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. हे इंजिन पेट्रोलवर 85 bhp ताकद, 113 Nm पीक टॉर्क तयार करते. सीएनजी मॉडेलमध्ये यात काहीशी घट होणार आहे.

टाटा टियागोची हॅचबॅक कार सध्या 9 व्हेरिअंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये 4 ट्रीम XE, XT, XZ आणि XZ+ आहेत. यापैकी एक किंवा दोन ट्रीममध्ये सीएनजी दिला जाणार आहे. टियागोची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे. टाटाच्या या सीएनजी कारची टक्कर थेट मारुतीची सेलेरिओ, व्हॅगन आर, ह्युंदाईची सँट्रोसारख्या कारशी होणार आहे. 
 

Web Title: TATA Tiago will come in CNG; spotted testing In India, will hit maruti, hyundai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.