टाटा टियागोचे नवे मॉडेल आले...पाहा काय आहे खास...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 03:33 PM2018-12-12T15:33:13+5:302018-12-12T15:34:00+5:30
टाटा मोटर्सला नवी ओळख मिळवून देणाऱ्या हॅचबॅक श्रेणीतील टियागोने कमी काळात मोठे यश संपादन केले आहे.
मुंबई : टाटा मोटर्सला नवी ओळख मिळवून देणाऱ्या हॅचबॅक श्रेणीतील टियागोने कमी काळात मोठे यश संपादन केले आहे. यामुळे टाटाने कमी किंमतीत कार बाजारात उतरवितानाच याच मॉडेलमध्ये काहीसे मात्र महत्वपूर्ण बदल करत टियागोचे नवे व्हर्जन एक्सझेड प्लस लाँच केले आहे.
टाटा मोटर्सने नवी तंत्रज्ञानाचा वापर करत पेट्रोल (१.२ एल रेव्होट्रॉन इंजिन) आणि डिझेल (१.०५ एल रेव्होटॉर्क इंजिन) ही तीन सिलिंडरची इंजिने या नव्या मॉडेलमध्ये दिली आहेत. याशिवाय फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही गाडी ऑरेंज आणि ओशन ब्ल्यू या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच ड्युअल टोन एक्स्टिरिअरही देण्यात आले आहेत.
12 डिसेंबरपासून ही कार विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. टियागो एक्सझेडप्लसच्या पेट्रोल व्हर्जनची एक्सशोरुम दिल्लीची किंमत ५.५७ लाख रुपये (सिंगल टोन) आणि ५.६४ लाख (ड्युअल टोन) तर डिझेलची ६.३१ लाख रुपये (सिंगल टोन) आणि ६.३८ लाख रुपये (ड्युअल टोन) असणार आहे.
काय आहे नव्या कारमध्ये खास?
१५ इंची ड्युअल टोन अलॉय चाके (केवळ पेट्रोल इंजिन पर्यायात उपलब्ध), टेलगेटवर क्रोम अॅसेंट, हार्मनची कनेक्टनेक्स्ट ७ इंची (१७.७८ सेमी) टचस्क्रीन प्रणाली), स्मोक्ड ब्लॅक बेझेलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प्ससह इलेक्ट्रिकली फोल्डिंग ओआरव्हीएम वेलकम फंक्शनसह देण्यात आले आहेत.