TATA च्या 'या' परवडणाऱ्या CNG कार 19 जानेवारीला होणार लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:23 PM2022-01-17T14:23:06+5:302022-01-17T14:25:04+5:30

tata tigor cng : लॉन्च झाल्यानंतर, टाटा टिगोर ही एकमेव कॉम्पॅक्ट सेडान असेल जी सामान्य इंजिन, सीएनजी आणि इलेक्ट्रिक तीनही मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल.

tata tigor cng spotted at dealership stockyard ahead of launch | TATA च्या 'या' परवडणाऱ्या CNG कार 19 जानेवारीला होणार लाँच!

TATA च्या 'या' परवडणाऱ्या CNG कार 19 जानेवारीला होणार लाँच!

Next

नवी दिल्ली : टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या दोन लोकप्रिय कारटाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टिगोर (Tata Tigor) आता  CNG व्हेरिएंटमध्ये आणणार आहे. 19 जानेवारी रोजी टाटा मोटर्स या कार लॉन्च करणार आहे. अलीकडेच, टिगोर सीएनजी कोणत्याही स्टिकर्सशिवाय डीलरशिप यार्डमध्ये उभी केलेली दिसली. लॉन्च झाल्यानंतर, टाटा टिगोर ही एकमेव कॉम्पॅक्ट सेडान असेल जी सामान्य इंजिन, सीएनजी आणि इलेक्ट्रिक तीनही मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल.

डीलरशिपच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार, टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. दरम्यान, फोटोमध्ये कारचे डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच असल्याचे दिसते. हे कारचे खालचे वेरिएंट आहे, ज्याला 15-इंच अलॉय व्हील आणि i-CNG बॅज देण्यात आला आहे.  टाटा टियागो आणि टाटा टिगोरचे सीएनएक्स मॉडेल्स आता अधिक किमतीचे असणार आहेत. या दोन्ही कारचे बुकिंगही अनधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे आणि शहर आणि डीलरशीपनुसार 5,000 आणि 11,000 रुपयांमध्ये दोन्ही सीएनजी मॉडेल्सची बुकिंग करता येईल.

सध्या टाटा टियागो आणि टाटा टिगोरसोबत, कंपनीने 1.2-लीटर तीन-सिलेंडर रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 86 हॉर्सपॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क बनवते. दोन्ही कारचे सीएनजी व्हेरिएंट देखील समान क्षमतेसह येऊ शकतात किंवा यामध्ये थोडीशी घसरण दिसू शकते. कंपनीने दोन्ही कारसाठी मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स पर्याय दिले आहेत, जरी फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन सीएनजी व्हेरिएंटमध्ये आढळू शकते.

टाटा टियागो सीएनजी आणि टाटा टिगोर सीएनजीसह, कंपनी या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंदाईला टक्कर देणार आहे. सध्या, मारुतीकडे बाजारात सर्वात मोठी सीएनजी रेन्ज आहे, जी ऑल्टो सीएनजीपासून सुरू होते आणि Ertiga सीएनजीपर्यंत जाते. ह्युंदाईने सेंट्रो सीएनजीपासून ह्युंदाई ऑरा सीएनजीपर्यंत बाजारात लॉन्च केले आहे. अशा परिस्थितीत टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी बाजारात येताच स्पर्धा वाढणार आहे. या दोन्ही सीएनजी व्हेरिएंटसोबत टाटा या सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा करणार आहे.

सरकार सीएनजी वाहनांना देतंय प्रोत्साहन 
या सर्व कंपन्यांनी सीएनजी व्हेरिएंटमध्ये वाहने सादर करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि यामुळेच ग्राहक आता फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी कार घेण्यास मोठी उत्सुकता दाखवत आहेत. भारत सरकार सीएनजी वाहनांनाही प्रोत्साहन देत आहे, कारण ते केवळ किफायतशीर नाहीत, तर त्यांच्या वापरामुळे इंधनाची आयातही कमी होईल. दरम्यान, या दोन्ही परवडणाऱ्या कार भारतात खूप पसंत केल्या जात आहेत आणि त्यांचे सीएनजी व्हेरिएंट ग्राहकांसाठी अधिक परवडणारे ठरणार आहेत.
 

Web Title: tata tigor cng spotted at dealership stockyard ahead of launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.