Tata Tigor CNG XM व्हेरिअंट लॉन्च, 4 स्टार रेटिंगवाली स्वस्त कार; वाचा किंमत अन् फिचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:46 PM2022-08-09T14:46:50+5:302022-08-09T14:47:22+5:30
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कारच्या विक्रीत वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने टाटा टिगोर सीएनजी एक्सएम (Tata Tigor CNG XM) व्हेरिअंट कार लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली-
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कारच्या विक्रीत वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने टाटा टिगोर सीएनजी एक्सएम (Tata Tigor CNG XM) व्हेरिअंट कार लॉन्च केली आहे. भारतातील लहान-मोठ्या शहरांमध्ये सीएनजी सहज उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल सीएनजी कारकडे वळत आहे. Tata Motors ही मारुती सुझुकी आणि Hyundai नंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी आहे, जी फॅक्टरी फिटेड CNG कार विकते. Tata Tigor व्यतिरिक्त कंपनी CNG सेगमेंटमध्ये Tata Tiago कार विकते. टाटा टिगोर सीएनजीच्या नवीन प्रकारात चार रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
Tata Tigor CNG XM Price: कीमत किती?
Tata Motors ने Tigor CNG चा कारचं नवीन व्हेरिअंट लॉन्च केलं आहे ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 7.4 लाख रुपये आहे. नव्या टाटा टिगोर CNG XZ व्हेरियंटपेक्षा 50,000 रुपये स्वस्त आहे. त्याच वेळी, टाटा टिगोरच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत ६ लाख रुपयांपासून ते ८.२९ लाख रुपयांपर्यंत सुरू होते. Tata Tigor च्या CNG व्हेरिअंटची किंमत आता ७.४ लाख ते ८.५९ लाख रुपयांच्या घरात आहे.
Tata Tigor iCNG: फीचर्स
टाटा मोटर्स टिगोर सीएनजी कारची आयसीएनजी म्हणून विक्री केली जाते. Tigor CNG चा XM व्हेरिअंट चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतो - ओपल व्हाइट, डेटोना ग्रे, ऍरिझोना ब्लू आणि डीप रेड. Tata Tigor iCNG मध्ये, ग्राहकांना रेन सेन्सिंग वायपर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि ब्लॅक आणि बेज कलर इंटिरियर्स, ड्युअल टोन कलर रूफसह नवीन फॅब्रिक सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.
Tata Tigor CNG: इंजिन आणि मायलेज
टाटा टिगोर CNG आणि Tiago CNG दोन्ही कारमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. ग्राहकांना दोन्ही कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. CNG वर टाटा टिगोरचे ARAI प्रमाणित मायलेज 26.49 kmpl आहे. टाटाच्या दोन्ही सीएनजी कार नुकत्याच लाँच झालेल्या मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी, वॅगन आर सीएनजी आणि ह्युंदाई ऑरा सीएनजीशी स्पर्धा करतात.