इंडियन रोड्सना इलेक्ट्रिफाईड करतील या स्वदेशी गाड्या; TATA पासून Maruti पर्यंत आणणार Electric Cars
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 04:00 PM2021-08-23T16:00:09+5:302021-08-23T16:10:21+5:30
Tata पासून Maruti पर्यंत आणणार तीन Electric Cars. सध्या इलेक्ट्रीक कार्सच्या मागणीत होतेय वाढ. पाहा कोणत्या आहेत कार्स, फीचर्स आणि किंमत.
इलेक्ट्रीक कार्सकडे लोकांचा आकर्षण सध्या वेगानं वाढताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक सध्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. आता अशा परिस्थितीत, वाहन उत्पादक देखील पारंपारिक इंधनावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या, अनेक देशांतर्गत कंपन्या आहेत जे इलेक्ट्रीक वाहनांवर वेगानं कामही करत आहेत.
टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स देशांतर्गत बाजारात लवकरच सादर करण्याच्या तयारीत आहेत. अलीकडेच, TATA Motors नं आपल्या इलेक्ट्रीक सेडान कार Tigor EV वरून पडदा उचलला आहे आणि या कारचे बुकिंग देखील सुरू करण्यात आलं आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रादेखील नवे इलेक्ट्रीक मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत. चला तर जाणून घेऊया इलेक्ट्रीक कार्स बद्दल ज्या लवकरच देशातील रस्त्यांना इलेक्ट्रीफाईड करणार आहेत.
Tata Tigor EV:
Nexon EV नंतर कंपनीकडून सादर करण्यात येणारी ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. आतापर्यंत टिगोर इलेक्ट्रीक सरकारी कार्यालयं आणि फ्लिट ऑपरेटरसाठी उपलब्ध होती. परंतु आता ही कार सर्वसामान्य ग्राहकांसाठीही सादर करण्यात आली आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 75hp पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही कार 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 5.7 सेकंदात पकडू शकते. नवीन Tigor EV साठी सर्वात मोठे अपडेट पॉवरट्रेन फ्रंटवर दिसत आहे, जे आता कंपनीच्या Ziptron EV पॉवरट्रेननं सुसज्ज आहे.
कंपनीनं या कारमध्ये 26kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रीक मोटरसाठी IP67 रेटिंग देखील देण्यात आले आहे. नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानासह, टिगोर इव्ही आता फास्ट चार्जिंगसह येते. फास्ट चार्जरमुळे, Tigor EV फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. टाटा मोटर्स या कारच्या बॅटरी आणि मोटरसह 8 वर्षे किंवा 1,60,000 किमी पर्यंतची वॉरंटीदेखील देत आहे. ही कार ३१ ऑगस्ट रोजी विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. जरी ड्रायव्हिंग रेंजबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली, तकी असं मानलं जातं की ही कार 300 किमी पर्यंतची रेंज देईल.
Maruti Suzuki EV:
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी दीर्घ कालावधीपासून इलेक्ट्रीक कारवर काम करत आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार WagonR चं इलेक्ट्रीक व्हेरिअंट बाजारात आणणार आहे. चाचणी दरम्यान ही कार अनेक वेळा पाहिली गेली आहे. मात्र, या कारशी संबंधित तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की ही कार एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.
मारुती सुझुकी त्याच्या परवडणाऱ्या आणि उच्च कार्यक्षमतेच्या कारसाठी ओळखली जाते. अशा परिस्थितीत या इलेक्ट्रीक कारची किंमत कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते त्या कारची किंमत 7 लाख ते 10 लाख रुपयांदरम्यान निश्चित केली जाऊ शकते. सध्या ही कार बाजारात येण्यास वेळ आहे, ही कार 2025 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.
Mahindra eKUV100:
महिंद्रा अँड महिंद्रानं गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आपली इलेक्ट्रीक SUV eKUV100 जगासमोर सादर केली होती. या एसयूव्हीची रचना केवळ नियमित मॉडेलवर आधारित आहे. या कारमध्ये 15.9kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. महिंद्राच्या या कारची इलेक्ट्रिक मोटर 54.4hp ची पॉवर आणि 120Nm ची टॉर्क जनरेट करते. असे सांगितले जात आहे की ही एसयूव्ही एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.
ही बॅटरी साध्या चार्जरद्वारे (फ्रंट राईट फेंडरवर पोर्ट वापरुन) 5 तास 45 मिनिटात 100 टक्के चार्ज केली जाऊ शकते आणि फास्ट चार्जरद्वारे (फ्रंट लेफ्ट फेंडरवर पोर्ट वापरुन) 55 मिनिटांत 80 टक्के पर्यंत जाऊ शकते. ही कार ९ लाखांपर्यंत लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.