CNG मध्ये येताच 'या' स्वस्तातल्या सेडानची धूम! विक्रीत दुप्पट वाढ, देते जबरदस्त मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:06 PM2022-11-15T15:06:36+5:302022-11-15T15:07:08+5:30

सीएनजी व्हेरिअंटने या कारची लोकप्रियता आणखी वाढवली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या कारच्या विक्रीत 190 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

tata tigor sedan sales increased after cng variant launch gives tremendous mileage | CNG मध्ये येताच 'या' स्वस्तातल्या सेडानची धूम! विक्रीत दुप्पट वाढ, देते जबरदस्त मायलेज

CNG मध्ये येताच 'या' स्वस्तातल्या सेडानची धूम! विक्रीत दुप्पट वाढ, देते जबरदस्त मायलेज

Next

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे अधिकांश ग्राहक आता CNG वाहनांकडे वळताना दिसत आहे. ग्राहकांचा हा कल पाहता, आता वाहन निर्माता कंपन्यादेखील आपला सीएनजी पोर्टफोलियो बळकट करण्यावर भर देत आहेत. टाटा मोटर्सने नुकतीच आपली कॉम्पॅक्ट सेडान कार Tata Tigor CNG व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली आहे. खरे तर ही सेडान तिच्या सेग्मेंटमध्ये सेफ्टी फीचर्स आणि क्रॅश रिपोर्टमुळे आधीपासूनच लोकप्रिय आहे. मात्र, सीएनजी व्हेरिअंटने या कारची लोकप्रियता आणखी वाढवली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या कारच्या विक्रीत 190 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

Tata Motors ने ऑक्टोबर महिन्यात या कॉम्पॅक्ट सेडान कारच्या एकूण 4,001 युनिट्सची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात केवळ 1,377 युनिट्सपेक्षा 190.56% अधिक आहे. विक्रीच्या बाबतीत ही देशातील चौथ्या क्रमांकाची बेस्ट सेलिंग सेडान कार आहे. हिच्या आधी, मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि ह्युंदाई ऑरा यांचा अनुक्रमे पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांक लागतो. यांपैकी होंडा अमेझला पेट्रोल आणि डिझेल असो दोन्ही इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. तर, इतर कार पेट्रोल इंजिन आणि कंपनी फिटेड सीएनजी किटमध्ये उपलब्ध आहेत.

टाटा टिगोर एकूण चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. हिची किंमत 6.10 लाख ते 8.84 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. हिच्या CNG व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 7.44 लाख रुपये एवढी आहे. कंपनीने या कारसोबत 1.2-लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 86PS पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी मॉडेमध्ये हे इंजिन 73PS ची पॉवर आणि 95Nm चा टॉर्क जरनेट करते. हिचे पेट्रोल व्हर्जन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. तर सीएनजी व्हेरिअंटमध्ये केवल मॅन्युअल ट्रान्समिशनचाच पर्याय मिळतो. 

असे आहेत फीचर्स -
फीचर्सचा विचार करता या कारमध्ये, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, रेन सेंसिंग वायपर्स, अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह 7 इंचांची ट्चस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, ऑटोमेटिक एयर कंडिशन (AC), पुश-बटन स्टार्ट/स्टॉप सारख्या सुविधा मिळतात.

मिळते जबरदस्त सेफ्टी - 
Tata Tigor ही देशातील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट सेडान कार पैकी एक आहे. कंपनीने दावा केला आहे, की ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. यामुळे कारमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची शाश्वती मिळते. या कारमध्ये डुअल फ्रंट एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स मळतात. टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या कारचे पेट्रोल मॉडेल 19.27 किलोमीटर तसेच, सीएनजी व्हेरिअंट 26.49 किलोमीटर प्रति किग्रॅचे मायलेज देते.
 

Web Title: tata tigor sedan sales increased after cng variant launch gives tremendous mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.