Tata च्या या सर्वात स्वस्त कारनं बाजी पलटली, विक्रीत थेट 84% वाढ, किंमत Punch पेक्षाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 02:44 PM2023-04-30T14:44:11+5:302023-04-30T14:48:29+5:30
टाटाच्या आणखी एका कारची विक्री अचानकपणे वाढली असून कारच्या विक्रीत तब्बल 84 टक्क्यांची वाढ झाली आहे.
टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या वाहनांच्या जबरदस्त विक्रीमुळे, टाटा मोटर्स सध्या देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी आहे. कंपनीच्या Tata Nexon SUV ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळात आहे. यामुळे ही कार टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर आहे टाटा मोटर्सची पंच ही मायक्रो एसयूव्ही. ही कार सातत्याने पहिल्या दहामध्ये कायम आहे. यातच, टाटाच्या आणखी एका कारची विक्री अचानकपणे वाढली असून कारच्या विक्रीत तब्बल 84 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Tata ची सर्वात स्वस्त कार -
या कारचे नाव आहे टाटा टियागो हॅचबॅक (Tata Tiago). ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. हिची किंमत 5.5 लाख रुपयांपासून सुरू होते. मार्च महिन्यात ही टाटा मोटर्सची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणार कार ठरली आहे. गेल्या महिन्याच्या या कारच्या 7366 युनिट्सची विक्री झाली. गेल्या एक वर्षापूर्वी, म्हणजेच मार्च 2022 मध्ये टियागोच्या केवळ 4002 युनिट्सची विक्री झाली होती. अशा प्रकारे टियागोच्या विक्रीत 84% एवढी ईअरली ग्रोथ दिसून आली आहे.
किंमत आणि व्हेरिअंट -
टाटा टियागो प्रामुख्याने XE, XM, XT(O), XT, XZ आणि XZ+ या 6 व्हेरिअंट्समध्ये विकली जाते. हिची किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होऊन 8.05 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते. आपण मिडनाइट प्लम, डेटोना ग्रे, ओपल व्हाइट, एरिजोना ब्लू आणि फ्लेम रेड या पाच रंगांमध्ये खरेदी करू शकता. यात 242 लिटरचा बूट स्पेस मिळतो. या कारची टक्कर थेट Maruti Suzuki Celerio, Wagon R आणि Citroen C3 सोबत असते.
मायलेज -
पेट्रोल एमटी - 19.01 किमी/लिटर
पेट्रोल एएमटी - 19 किमी प्रति लिटर
सीएनजी - 26.49km/kg
एनआरजी एमटी/एएमटी - 20.09 किमी/लीटर