Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:51 PM2022-06-17T22:51:37+5:302022-06-17T22:52:48+5:30

ही एसयुव्ही नेक्सॉन बेस्ड आणि कुप स्टाईल असेल.

tatas powerful suv coming to stop talking about hyundai creta see features and look | Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक

Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक

googlenewsNext

Tata Motors येणाऱ्या काही महिन्यांमधअये मीडसाईज एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी नवी एसयुव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. ही एसयुव्ही नेक्सॉन बेस्ड आणि कुप स्टाईल असेल. याचं संभाव्य नाव टाटा ब्लॅकबर्ड असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येते. कंपनी पुढीव वर्षी म्हणजे २०२३ च्या पहिल्या तिमाहीत यावरून पडदा उठवण्याची शक्यता आहे.

सध्या, टाटा हॅरियरसह बाजारात आपले अस्थित्व निर्माण करणारी टाटा मोटर्स आगामी काळात नेक्सॉनवर आधारित मीडिसाईज एसयुव्हीची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos यासह इतर लोकप्रिय SUV बरोबर स्पर्धा करेल. Tata Blackbird पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत लॉन्च केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटाची आगामी मीडसाईज एसयूव्ही ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते. मात्र, कंपनीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

टाटा मोटर्स आता इलेक्ट्रीक मोबिलिटीवरही लक्ष केंद्रित करत असल्याने आगामी टाटा नेक्सॉन आधारित मिडसाईज कूप एसयूव्हीचे इलेक्ट्रीक व्हेरियंट देखील येऊ शकेल अशी अपेक्षा आहे. Tata Blackbird बद्दल बोलायचे झाल्यास, या SUV ची लांबी 4.3 मीटर असेल आणि ती X1 प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाईल, ज्यावर Tata Nexon देखील आधारित आहे. जर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर त्यात नेक्सॉन प्रमाणे ए-पिलर, विंडस्क्रीन आणि फ्रन्ट डोर दिसतील. याचा रिअर लूक अतिशय रिफ्रेशिंग देण्यात आला आहे.

Tata ची आगामी SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह सादर केली जाण्याची शक्यता आहे. यात मोठी सीट, अधिक लेगरूम आणि बूट स्पेस असेल. त्याच वेळी, या SUV च्या इलेक्ट्रीक व्हेरियंटमध्ये 40kWh बॅटरी पॅक दिसेल, ज्याची बॅटरी रेंज 400 किमी पर्यंत असू शकते. आगामी टाटा ब्लॅकबर्डमध्ये उत्कृष्ट लूक आणि पॉवरफुल इंजिन तसेच अत्याधुनिक फीचर्स असतील.

Web Title: tatas powerful suv coming to stop talking about hyundai creta see features and look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.