ओव्हरटेक एक तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:29 PM2017-08-08T20:29:40+5:302017-08-08T20:33:23+5:30

ओव्हरटेक हे एक तंत्र आहे. आज अनेक ठिकाणी एक्स्प्रेसवेसारखे चारपदरी रस्ते झाले असले तरी सिंगल रोडही आहेत त्या ठिकाणी ओव्हरटेक करतानाचे तंत्र प्रथम नीट ध्यानात घ्या, कारण ओव्हरटेक म्हणजे काही शर्यत नाही हे लक्षात घ्यावे.

A technique of overtake | ओव्हरटेक एक तंत्र

ओव्हरटेक एक तंत्र

Next

कार, बाईक वा अन्य अवजड वाहन यांचा वेग हा ते वाहन चालवणाऱ्याच्या हाती असतो. त्या वेगावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. वेग आला की ओव्हरटेक करणे आले. पण ओव्हरटेक करताना खूप काळजी घ्यावी लागते. अगदी चार लाईनच्या एक्स्प्रेसवरून जात असा की  विभाजक म्हणजे divider नसणाऱ्या सिंगल रस्त्यावरून जात असा. मुळात ओव्हरटेक करणे म्हणजे तुम्ही शर्यत लावलेली आहे असे अजिबात नाही, मात्र तुमची मानसिकता ओव्हरटेक करताना शर्यतीची असू नये. आपल्याच पुढे आपल्याच दिशेने जात असलेल्या व आपल्या नियमित गतीपेक्षा कमी असलेल्या वाहनाला ओलांडून आपले वाहन त्या वाहनाच्या पुढे नेणे, म्हणजे त्या वाहनाला ओव्हरटेक करणे.

भारतामध्ये राईट हॅण्ड ड्रायिव्हंग आहे. समोरून येणारे वाहन हे ड्रायव्हरच्या उजव्या हाताने येत असते. येथे ओव्हरटेक करताना पुढील वाहनाच्या उजव्या अंगाने व आपल्या डाव्या अंगाने पुढे जायचे असते. त्यामुळे सिंगल रस्ता असताना विरुद्ध दिशेकडून येणारे वाहन ड्रायव्हरला ओव्हरटेक करताना दिसते. तसे येणारे वाहन लक्षात घेऊन ते वाहन येत नसल्याची खात्री करून वा लांबवरून येणारे वाहन असेल तर त्याच्या व आपल्या वाहनाच्या गतीचा अंदाज घेऊन आपल्या वाहनाची गती नियंत्रित ठेवून पुढील वाहनाला ओव्हरटेक करायची असते. तसेच त्याचवेळी मागून येणार्या वाहनाची गतीही काय आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी आपल्या कारच्या आरशांमध्ये खात्री करून घ्यायची असते. त्यासाठी आपल्या वाहनाचा उजव्या बाजूचा साईड इंडिकेटर देत समोरुन अन्य वाहन येत नाही याची खात्री करीत पुढील वाहनाला आपण ओव्हरटेक करत आहोत, यासाठी अप्पर डिप्पर देत व आपण हॉर्नचा आवश्यक वापर करून ओव्हरटेक करावी. त्यानंतर त्या वाहनाच्या पुढे आल्यावर लगेच डाव्या बाजूच्या आरशात ते वाहन आपल्या बाजूने किती लांब आहे याचा अंदाज घेत लगेच आपण त्या वाहनाच्या पुढे योग्य अंतर आहोत की नाही, ते पाहून आपल्या वाहनाच्या डाव्या अंगाने कार घेत राहावी व त्याआधी डाव्या बाजूचा साईड इंडिकेटर द्यावा. सर्वसाधारणपणे आपल्या डाव्या बाजूला आरसा असल्स त्यात मागील वाहन दिसते. सेंटरला म्हणजे कारच्या आत आरसा पाहावा. त्यात मागील वाहन िदसले की मग डाव्या अंगाला आपली कार घेत त्याच्यापेक्षा गती जास्त ठेवत ओव्हरटेक ज्या वाहनाला करीत आहोत, त्या वाहनापुढे म्हणजे त्याच्या रांगेत आपली कार घ्यावी, हे करीत असताना समोरून येणाऱ्या वाहनाचाही अंदाज घ्यावा, ते वाहन गतीने येत असेल तर आपली व त्याची धडक होऊ नये यासाठी आपला वेग आवश्यक त्या प्रमाणात वाढवावा मात्र इतक्या हातघाईवर येऊन ओव्हरटेक करू नये.

शक्यतो समोरून येणारे वाहन लांब असेल व आपल्या मोटारीचा वेग ओव्हरटेक ज्य़ा वाहनाला करीत आहोत, त्यापेक्षा आवश्यक तितका अधिक असेल तर पुरेसा आहे. तसेच समोरच्या रस्त्याचा व रस्त्याच्या डाव्या अंगाचाही वेध घेत रस्त्याच्या बाहेर आपण जाणार नाही, याची काळजी घेत स्टिअिरंगवर नियंत्रण ठेवत ओव्हरटेक करावी. मागच्या वाहनाच्या पुढे जाताच वलगेच ओव्हरटेक झाली असे समजून आपली मोटार त्यच्या पुढे आणू नये, त्या वाहनाचा वेग लक्षात घ्यावा. ओव्हरटेकचे हे पहिले साधे तंत्र लक्षात घ्यावे. वेगावर नियंत्रण योग्य असेल व कारच्या स्टिअिरंगवर तुमचा योग्य ताबा असेल तरच ओव्हरटेक करावी ओव्हरटेकच्या प्रकारातील हे एक पहिले साधेसुधे तंत्र आहे. पण तरीही हे तंत्र वापरताना शांत चित्त हे महत्त्वाचे.

Web Title: A technique of overtake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.