चीनच्या रस्त्यावर टेस्लाच्या कारचा हाहाकार! VIDEO मध्ये पाहा धडकी भरवणारं दृष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 10:17 PM2022-11-14T22:17:24+5:302022-11-14T22:19:02+5:30
टेस्ला मॉडेल Y, हाई स्पीडने धावताना आणि रस्त्यात येतील त्या वाहनांना धडक देताना दिसत आहे.
चीनमध्ये टेस्लाकारच्या रस्त्यावरील हाहाकाराचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चीनच्या रस्त्यावर टेस्ला मॉडेल Y कार कशा पद्धतीने अचानकपणे नियंत्रणाबाहेर गेली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासंदर्भात टेस्लाने म्हटले आहे, की कार वेगात असताना कारचे ब्रेक लाइट चालू नव्हते. कारमधील डेटा दर्शवतो की, कार धावत असताना ब्रेकवर पाय ठेवल्याने कुठलीही अॅक्शन झाली नाही. मात्र, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हा व्हिडिओ Reddit वर शेअर करण्यात आला आहे. यात चीनच्या ग्वांगडोंगमधील अरुंद रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार धावताना दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार ही घटना 5 नोव्हेंबरला दक्षीण प्रांतातील ग्वांगडोंग येथे घडली. यात एका बाइक स्वाराचा आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या व्हिडिओमध्ये टेस्ला मॉडेल Y, हाई स्पीडने धावताना आणि रस्त्यात येतील त्या वाहनांना धडक देताना दिसत आहे. वाहनांना धडक दिल्यानंतर काही वेळाने ही कार थांबली.
टेस्लाच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता -
सध्या चीनी पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनंतर, चीनच्या बाजारपेठेत टेस्लाच्या प्रतिमेस धक्का पोहोचू शकतो. अमेरिकेतील ईव्ही निर्माता कंपनी टेस्ला या प्रकरणाच्या तपासात मदत करत आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चालकाच्या कुटुंबातील एका एका सदस्याने म्हटले आहे, की ब्रेक पेडलमध्ये समस्या होती.
Crazy @Tesla video from a week ago. Just saw it on Reddit.
— Ravi Handa (@ravihanda) November 13, 2022
Driver was trying to park the car and then things went awry.
Parking button didn’t work.
Breaks didn’t work.
It just kept on accelerating.
Two people including a high school girl dead. pic.twitter.com/GTwVs7QOg6
टेस्लाचे म्हणणे? -
टेस्लानुसार, जेव्हा कार वेगात धावत होती, तेव्हा मॉडल Y चे ब्रेक लाइट्स सुरू नव्हते. यामुळे कार धावत असताना ब्रेकमध्ये कसल्याही प्रकारची अॅक्शन होत व्हती. मात्र, घटनेचा तपास केला जात आहे.