मस्क यांची टेस्ला कंपनी जाहिरातींवर किती खर्च करते? आकडा पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:16 AM2022-03-23T05:16:51+5:302022-03-23T05:17:19+5:30
बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जाहिरातींवरचा खर्च हा त्यांच्या एकूण उत्पादन खर्चाचा मोठा भाग असतो.
बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जाहिरातींवरचा खर्च हा त्यांच्या एकूण उत्पादन खर्चाचा मोठा भाग असतो. पण टेस्ला या वाहन निर्मिती कंपनीच्याबाबतीत मात्र सारा उफराटा कारभार आहे. टेस्लाचे इलॉन मस्क यांच्या ट्विटर हॅण्डलवरून होते तेवढीच जाहिरात टेस्लाच्या गाडयांना कदाचित पुरत असावी. कारण विकल्या गेलेल्या प्रत्येक गाडीच्या मागे संशोधन आणि विकासासाठी २,९८४ अमेरिकन डॉलर्स खर्च करणाऱ्या टेस्ला या कंपनीचा प्रती कार जाहिरातीचा खर्च शून्याच्या जवळपास आहे. वाहननिर्मिती उद्योगातल्या बाकीच्या स्पर्धा कंपन्या विकल्या गेलेल्या प्रत्येक गाडीमागे साधारण ४०० ते ७०० डॉलर्स जाहिरातीसाठी खर्च करतात, पण टेस्ला ? - शून्य!