थंडीत सकाळी सकाळी बाईक स्टार्ट होत नाही, हे उपाय करा; पहिल्याच झटक्यात स्टार्टचे बटन काम करेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:51 AM2024-12-04T10:51:51+5:302024-12-04T10:53:50+5:30
पहिल्याच झटक्यात बाईक स्टार्ट करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या आजमावून पाहिल्यास भर थंडीत थकायला होणार नाही.
थंडीत सकाळी सकाळीच बाईक, स्कूटर स्टार्ट करण्यास अनेकांना समस्या येते. अनेकदा स्टार्टर मारून मारून लोक थकतात. किक स्टार्टने देखील दोन-चारदा प्रयत्न केल्यानंतर एकदाची स्कूटर चालू होते. परंतू, हा त्रास रोजचाच असल्याने अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर होतो. मग सुरु होते वेळेची आणि वेगाची स्पर्धा. यातून अपघातही होण्याची शक्यता असते. एका स्टार्टमुळे पुढे काय काय वेळ येऊ शकते, याचा विचार कधी केलाय का...
पहिल्याच झटक्यात बाईक स्टार्ट करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या आजमावून पाहिल्यास भर थंडीत थकायला होणार नाही. थंडीच्या काळात इंधन योग्य प्रकारे जळण्यासाठी चोकचा वापर करावा. बाईक स्टार्ट केल्यानंतर चोक ३०-६० सेकंद सुरुच ठेवावा नंतर बंद करावा.
थंडीत बॅटरीची क्षमता कमी होते. यामुळे बॅटरी गरज असेल तर बदलावी. बॅटरीचे कनेक्शन साफ करून घ्यावे. बॅटरी उतरली असल्यास चार्ज करून घ्यावी. स्कूटर चालू करताना किक स्टार्टने करावी.
योग्य इंजिन ऑईलचा वापर करावा. हिवाळ्यासाठी चांगले असलेले किंवा कमी ग्रेडच्या इंजिन ऑईलचा वापर करावा. तसेच बाईक खुल्या जागेत म्हणजे थंडीत पार्क करणे टाळावे. इंजिन खूप थंड न होण्यासाठी ते कव्हर करावे.
स्पार्क प्लग खराब असेल तर तो तपासून बदलून घ्यावा. थंडीत पेट्रोलच्या टाकीत ओल जमू शकते. यामुळे टाकी नेहमी किमान अर्धी भरलेली ठेवावी. स्टार्ट झाल्यानंतर गाडी १-२ मिनिटे न्यूट्रलमध्ये सुरु ठेवावी.