देशातील सर्वाधिक खपाची कार, सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही; अल्टोच्या किंमती...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 04:53 PM2023-02-09T16:53:00+5:302023-02-09T16:53:29+5:30
प्रत्येकाचे एक स्वप्न असते, आपलीही एक कार असावी. काही वर्षांपूर्वी टाटाने सामान्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॅनो आणली, पण ती फेल गेली.
प्रत्येकाचे एक स्वप्न असते, आपलीही एक कार असावी. काही वर्षांपूर्वी टाटाने सामान्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॅनो आणली, पण ती फेल गेली. मारुतीची अल्टो तर तेव्हा सर्वाधिक खपाची होतीच. पण आता ती देखील सामान्यांच्या आवाक्यात राहिली नसल्याचे चित्र आहे. या अल्टोचे काही महिन्यांपूर्वी नवे व्हर्जन आले आहे.
मारुतीने अल्टो ८०० आणि १००० सीसी पर्यायांमध्ये आणली आहे. अल्टो ८०० ला Std (O), LXi (O), VXi आणि VXi+ सारखे पाच व्हेरिअंट आणले आहेत. याची किंमत 3.54 लाख रुपये एक्सशोरुम आणि 5.13 लाख रुपये एक्स शोरुम एवढी आहे. म्हणजे साधी अल्टो आता सहा लाखांना मिळत आहे. तर अल्टो के१० चे चार ट्रीमसह सात व्हेरिअंट आहेत. या कारची एक्सशोरुम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरु होते ती 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती सुझुकी अल्टो ही एंट्री लेव्हल हॅचबॅक आहे, जी CNG पर्यायामध्ये देखील उपलब्ध आहे. Alto 800 च्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 22.05 kmpl पर्यंत आहे आणि CNG व्हेरियंटचे मायलेज 31.59 km/kg पर्यंत आहे. मारुती अल्टो K10 च्या पेट्रोल प्रकारांचे मायलेज 24.39 kmpl पर्यंत आहे आणि CNG प्रकारांचे मायलेज 33.85 km/kg पर्यंत आहे.
Maruti Suzuki Alto K10 Std व्हेरिएंटची किंमत 3.99 लाख रुपये, LXi व्हेरिएंटची किंमत 4.82 लाख रुपये, VXi व्हेरिएंटची किंमत 5.04 लाख रुपये आहे. K10 VXi प्लस व्हेरिएंटची किंमत 5.33 लाख रुपये, K10 VXi AT प्रकारची किंमत 5.59 लाख रुपये, K10 VXi Plus AT प्रकारची किंमत 5.88 लाख रुपये, K10 VXi S-CNG प्रकारची किंमत 5.95 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Alto 800 ची किंमत STD Opt प्रकारची किंमत 3.54 लाख रुपये, LXI Opt व्हेरिएंटची किंमत 4.23 लाख रुपये, VXI व्हेरियंटची किंमत 4.43 लाख रुपये, VXI प्लस व्हेरियंटची किंमत 4.57 लाख रुपये, LXI Opt S-CNG व्हेरियंटची किंमत 5.13 लाख रुपये आहे.