चर्चा तर होणार! लोक साडेसात कोटी मोजणार, ही कार फक्त 530 किमीचीच रेंज देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:37 PM2024-01-19T17:37:46+5:302024-01-19T17:38:02+5:30
ईव्ही कशाला? इंधनावरचे पैसे वाचवायला ना? या कंपनीने आणली 7.5 कोटींची कार
वाढत्या इंधनावरील पैसे वाचविण्यासाठी लोक इलेक्ट्रीक कार घेत आहेत. यासाठी दुप्पट पैसे मोजत आहेत. असे असले तरी अतिश्रीमंत लोक कशाला इलेक्ट्रीक कार घेतील? त्यांना शंभर रुपयांचे पेट्रोल असे कितीसे महाग वाटणार आहे. परंतु, याच श्रीमंतांसाठी श्रीमंत कंपन्या इलेक्ट्रीक कार आणत आहेत. रोल्स रॉयसने तब्बल साडे सात कोटींची इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे.
Rolls-Royce Motor Cars ने भारतीय बाजारात पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार Spectre लाँच केली आहे. याची किंमत साडे सात कोटी रुपये एक्स शोरुम पासून सुरु होत आहे. Rolls-Royce Specter ब्रँडच्या ऑल-अॅल्युमिनियम स्पेसफ्रेम आर्किटेक्चरवर बनविण्यात आली आहे. या स्ट्रक्चरला आर्किटेक्चर ऑफ लक्झरी असे नाव देण्यात आले आहे.
ही कार नवीन फॅंटम, घोस्ट आणि कुलीनन मॉडेल्सच्या बेसवर आधारित आहे. रोल्स रॉयस २०३० पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रीक कारच बनविणार आहे. यामध्ये 102 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. याची रेंज 530 किमी एवढी आहे.
ही कार 2,890 किलो वजनाची आहे. स्पेक्टर फक्त 4.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. यामध्ये दोन मोटरचे पर्याय देण्यात आले आहेत. एक 577 bhp आणि 900 Nm पीक टॉर्क निर्माण करते.