कार खरेदीचे स्वप्न महाग; किमतीत यंदा ५% वाढ; बीएस-६ नव्या नियमांमुळे वाढला खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 05:43 AM2023-05-27T05:43:57+5:302023-05-27T05:44:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे. १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन नियम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे. १ एप्रिलपासून देशात नवीन उत्सर्जन नियम बीएस-६ चा दुसरा टप्पा लागू झाला असून, बहुतांश सर्व कंपन्यांच्या कारच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
कंपन्यांकडून जानेवारी, मार्च-एप्रिल आणि मेमध्ये पुन्हा किमती वाढविण्यात आल्या. किया इंडिया, एमजी मोटार इंडिया यांनी मार्चमध्ये आणि मारुती सुझुकी व महिंद्रा अँड महिंद्राने एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा किमती वाढविल्या. होंडाने एप्रिलमध्ये काही मॉडेलच्या, तर टाटा मोटर्सने मेमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किमती ०.६ टक्के ते ५ टक्के वाढविल्या. बीएस-६ च्या दुसऱ्या टप्प्यातील नियमांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना कारमध्ये अतिरिक्त उपकरणे लावावी लागत आहेत. त्याचा बोजा कंपन्या हळूहळू ग्राहकांवर टाकत आहेत.
जूनमध्ये सप्टेंबरनंतर आणखी वाढणार किमती
n जूनमध्ये आणि सप्टेंबरनंतर कारच्या किमती वाढू शकतात.
n ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ विशाल दामले यांनी सांगितले की, बीएस-६ अंमलबजावणीसाठी कंपन्या हळूहळू किमती वाढवित आहेत.
n ३ ते २० हजार रुपयांपर्यंत किमती वाढू शकतात. सप्टेंबरनंतर आणखी ०.५% ते २% वाढ होऊ शकते.
अशा वाढल्या किमती
एमजी मोटर इंडिया ३५-६० हजार
महिंद्रा अँड महिंद्रा १५-५१ हजार
किया इंडिया ४०-५० हजार
होंडा १०-५० हजार
मारुती सुझुकी ०८-१५ हजार
टाटा मोटर्स ०३-१५ हजार