अर्टिगा, XL 6 ही नकोशी वाटेल! मारुती नवी सात सीटर एमपीव्ही आणतेय; काउंट डाऊन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 05:29 PM2023-06-13T17:29:22+5:302023-06-13T17:30:59+5:30
कंपनीने नुकताच या कारचा टीझर लाँच केला आहे. यामध्ये कारची बॉडी, लुक आणि डिझाईनची माहिती देण्यात आली आहे.
मारुती सुझुकीने आपला गिअर बदलला आहे. मारुतीने आपल्या नव्या सात सीटर कारच्या नावाचा खुलासा केला आहे. मारुतीच्या या नव्या कारचा लुक पाहता ती सध्याच्या अर्टिगा आणि XL 6 च्या लुकपेक्षा थोडी वेगळी आणि भारदस्त असणार आहे.
कंपनीने नुकताच या कारचा टीझर लाँच केला आहे. यामध्ये कारची बॉडी, लुक आणि डिझाईनची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीच्या मिडीया रिपोर्टमध्ये या कारला Maruti Engage असे नाव असल्याचे सांगितले जात होते. परंतू आता कंपनीनेच Maruti Invicto असे नाव असल्याचे जाहीर केले आहे.
अर्थात ही सात सीटर कार टोयोटा इनोव्हाचे पुढचे रुप असलेले Innova Hycross चीच कॉपी असणार आहे. मारुतीची ही कार सर्वात महागडी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Maruti Invicto चे बुकिंग सुरु झाले आहे. तसेच ही कार २० लाख रुपयांच्या किंमतीमध्ये आणली जाऊ शकते.
मारुतीने टोयोटा हाइराइडरवर ग्रँड व्हिटारा लाँच केली होती. तसेच या नव्या कारमध्ये काही बाहेरुन बदल केले जाणार आहेत. मात्र, कारची साईज, अंतर्गत रचना आदी एकसारखीच असणार आहे.
काय काय फिचर्स असतील...
इनोव्हा हायक्रॉस दोन पॉवरट्रेन पर्यायांसह येते. पहिला पर्याय म्हणजे शुद्ध पेट्रोल पॉवरट्रेन जे 173 Bhp आणि 209 Nm टॉर्क निर्माण करणारे 2.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरते. दरम्यान, इतर ड्राइव्हट्रेन पर्याय देखील 2.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरतो, परंतु हायब्रिड सेटअपसह येतो आणि जास्तीत जास्त 184 Bhp आणि 188 Nm टॉर्क निर्माण करतो.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सुपर व्हाईट, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सिल्वर मेटॅलिक, अॅटिट्यूड ब्लॅक मीका, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाईन, ग्रेडेड ब्रॉन्झ मेटॅलिक आणि ब्लॅकिश ग्लास फ्लेकमध्ये उपलब्ध आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (TNGA) वर आधारित आहे. ही एक मोनोकॉक एमपीव्ही आहे तर इनोव्हा क्रिस्टा एक लॅडर-ऑन-फ्रेम एमपीव्ही आहे.