पहिला येईल त्याला पहिली मिळणार! नव्या लूकमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ लाँच; मागचा दरवाजा 'गायब'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:18 PM2022-06-27T19:18:26+5:302022-06-27T20:01:30+5:30
नव्या स्कॉर्पिओमध्ये सीट्स ते इंटिरिअरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कमांड सीट देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन दशकांपासून दादा, भाईंच्या गळ्यातील ताईत झालेली महिंद्रा स्कॉर्पिओ नव्या रुपात आली आहे. महिंद्राने New Scorpio-N भारतीय बाजारात नव्या रुपात, नव्या फिचर्समध्ये लाँच केली आहे. महिंद्रा या एसयुव्हीला ‘बिग डॅडी ऑफ एसयूवी’ (Big Daddy of SUVs) या नावाने देखील प्रमोट करत आहे.
स्कॉर्पिओची बुकिंग ३० जुलैपासून सुरु होणार आहे. ऑनलाईन आणि डीलरशीपकडे अशा दोन्ही ठिकाणी ग्राहक ही कार बुक करू शकतात. पहिला येईल त्याला पहिली कार दिली जाईल. ३० मोठ्या शहरांमध्ये याची टेस्ट ड्राईव्ह ५ जुलैपासून सुरु केली जाईल. अन्य शहरांमध्ये १५ जुलैपासून टेस्ट ड्राईव्ह सुरु केली जाईल. स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत ११.९९ लाख रुपये आहे. शेवटचे व्हेरिअंट 19.49 लाख रुपयांना मिळेल.
नव्या स्कॉर्पिओमध्ये सीट्स ते इंटिरिअरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कमांड सीट देण्यात आल्या आहेत. यांची पोझिशन उंच असते. याचसोबत स्कॉर्पिओचा मागील दरवाजा उघडणार नाही. म्हणजेच मागील सीटवर जाण्यासाठी मध्यल्या सीटवरून जावे लागणार आहे. परंतू ते फोल्ड करण्याची गरज नाही. तिसऱ्या रोमध्ये जाण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली आहे.
2.0-लीटर mStallion चार सिलिंडर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर mHawk डिझेल इंडिन देण्यात आले आहे. 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमैटिक ट्रांसमिशन यूनिट मध्येदेखील ही एसयुव्ही मिळणार आहे. या कारला चेन्नईच्या Mahindra Research Valley मध्ये बनविण्यात आले आहे. Mahindra Scorpio N चा इंस्ट्रूमेंट कंसोल पूर्णपणे डिजिटल आहे. 8-इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. सोनीचे 12 स्पीकर साउंड सिस्टिम देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सहा एअरबॅगही देण्यात आल्या आहेत.