इलेक्ट्रिक वाहनांची नुसतीच पोकळ ‘हवा’; रिपोर्टमधून इको फ्रेंडली नसल्याचं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:36 AM2022-07-04T05:36:01+5:302022-07-04T05:36:16+5:30
लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते
इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला वाटतात तितक्या पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली नसल्याचे समोर आले आहे. एका अहवालानुसार, एक इलेक्ट्रिक कारसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जमिनीतून काढताना ४,२७५ किलो ॲसिड कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष तयार होतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेच फायद्याची आहेत का हे जाणून घेऊ...
इलेक्ट्रिक वाहनांमुळे काय होते नुकसान?
ईव्हीमध्ये १३,५०० लिटर पाणी लागते, तर पेट्रोलमध्ये जवळपास ४ हजार लिटर पाणी असते. जर ईव्हीला कोळशावर चालणाऱ्या विजेवर चार्ज करून १.५ लाख किमी चालवल्यास पेट्रोल कारपेक्षा केवळ २० टक्के कमी कार्बन निर्माण होईल. भारतात ७० टक्के वीज कोळशापासून निर्माण होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या संशोधनानुसार ३३०० टन लिथियम कचऱ्यापैकी केवळ २ टक्के पुनर्वापर केला जातो, तर ९८ टक्के प्रदूषण पसरवते.
जमिनीला कसा बसतो फटका?
लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते. लिथियमचा पर्यावरणपूरक म्हणून गौरव केला जातो; परंतु ते जमिनीतून काढून टाकणे पर्यावरणासाठी ३ पट जास्त विषारी आहे.
सर्व गाड्या ईव्ही झाल्या तर प्रदूषण कमी होईल?
संशोधकांच्या मते, जगात सुमारे २०० कोटी वाहने आहेत. यातील केवळ १ कोटी वाहने इलेक्ट्रिक आहेत. जर सर्व वाहने ईव्हीमध्ये रूपांतरित केली तर त्या गाड्या तयार करण्यासाठी जाणाऱ्या ॲसिड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसी साधने नाहीत. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक वाढवून आणि खासगी गाड्या कमी करूनच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करता येईल.
भारताचे लक्ष्य?
२०३० पर्यंत ७० टक्के व्यावसायिक कार, ३० टक्के खासगी कार, ४० टक्के दुचाकी आणि ८० टक्के तीन चाकी वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी २०३० पर्यंत ४४.७ टक्के वीज अक्षय ऊर्जेपासून तयार केली जाईल, आता ती २१.२६
टक्के आहे.
लोकांना कशाची चिंता?
चार्जिंग स्टेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, सुरक्षेची काळजी, कमी पर्याय, ब्रँडची उपलब्धता