मर्सिडीज बेंझ नावामागची गोष्ट, उद्योजक म्हणाला माझ्या बॅटरीचे नाव लावा; मालक तयार झाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:37 IST2025-01-22T17:36:30+5:302025-01-22T17:37:48+5:30
तो काळ घोडागाड्यांचा होता. गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ हे एकमेकांना तेव्हा भेटलेलेही नव्हते.

मर्सिडीज बेंझ नावामागची गोष्ट, उद्योजक म्हणाला माझ्या बॅटरीचे नाव लावा; मालक तयार झाला...
मर्सिडीज नावाच्या जगविख्यात कंपनीला शंभरीत पदार्पण करण्याचे वेध लागले आहेत. लक्झरीयस गाड्यांसाठी मर्सिडीज बेंझ ही कंपनी ओळखली जाते. या कंपनीच्या कार एडव्हान्स फिचर्सनी युक्त अशा असतात. इतर कंपन्यांकडे ती फिचर्स बऱ्याच वर्षांनी येतात. अनेकांचे ही कार घेण्याचे स्वप्न असते. परंतू ते प्रत्येकाचेच पूर्ण होते असे नाही. आज जरी या कंपनीला मर्सिडीज बेंझ नावाने ओळखले जात असले तरी सुरुवातीला या कंपनीचे हे एकत्र नावच नव्हते.
या नावामागेही एक कहाणी आहे. तो काळ घोडागाड्यांचा होता. गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ हे एकमेकांना तेव्हा भेटलेलेही नव्हते. दोघेही काहीतरी नवीन करण्याच्या ध्येयाने झपाटलेले होते आणि त्यात व्यस्त होते. गॉटलीब डेमलर पेट्रोलवर चालणारे इंजिन विकसित करण्यावर काम करत होते. तर कार्ल बेंझ चारचाकी वाहन योग्यरित्या हाताळू शकेल असे ऑटोमोबाईल इंजिन विकसित करण्यावर काम करत होते. प्रयोगांमध्ये यशस्वी झाल्यानंतर, बेंझने १८८३ मध्ये स्वतःची कंपनी बेंझ अँड सी उघडली आणि १८८६ मध्ये मोटरवॅगनच्या नावाने त्याच्या इंजिनचे पेटंट घेतले.
दुसरीकडे डेमलरयांचेही प्रयोग यशस्वी झाले आणि त्यांनी १८९० मध्ये त्यांचे मित्र विल्हेल्म मेबॅक यांच्यासोबत डेमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट (DMG) ही कंपनी स्थापन केली. आता मर्सिडीज-बेंझ विल्हेल्म मेबॅक या नावाने कार बनवते. डेमलर यांनी तयार केलेले इंजिन हे ट्रॉलीपासून ते मोटारसायकलपर्यंत कोणत्याही वाहनाला जोडून चालविता येत होते. या क्षेत्रात आल्यावर या दोन्ही कंपन्या एक झाल्या आणि त्यांनी लक्झरी कार बनविण्यास सुरुवात केली व लोकप्रिय झाली.
कंपनी एकत्र आली पण नाव दिले गेले नव्हते. एमिल जेलिनेक नावाचा एक व्यावसायिक होता. त्याने एका एका रेसिंग स्पर्धेसाठी ३६ डेमलर-बेंझ कार खरेदी केल्या. त्याचा बॅटरीचा व्यवसाय होता. या कार घेण्यापूर्वी त्याने एक अट ठेवली होती. ती म्हणजे कंपनीने त्यांच्या नावापुढे त्यांची बॅटरी मर्सिडीज जेलिनेक जोडली तर करार करणार, दोघांनीही ही अट मान्य केली आणि १९०२ मध्ये मर्सिडीज बेंझ हे नाव नावारुपाला आले. डेमलर-बेंझला मर्सिडीज-बेंझ म्हणून ओळखले जाऊ लागले. या नावाची पहिली कार यायला २४ वर्षे लागली. १९२६ मध्ये पहिली कार आली.