अख्खा जानेवारी संपला, कियाने २५०२५ कार विकल्या, पण या कारला मिळाले नाही एकही गिऱ्हाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:18 IST2025-02-04T13:06:44+5:302025-02-04T13:18:04+5:30
कियाने जानेवारी महिन्यात २५ हजार कार विकल्या आहेत. परंतू, याची एक बाजू अशीही आहे की कियाच्या या कारला एकही ग्राहक मिळालेला नाहीय.

अख्खा जानेवारी संपला, कियाने २५०२५ कार विकल्या, पण या कारला मिळाले नाही एकही गिऱ्हाईक
कियाने फार कमी वर्षांत भारतीय बाजारात भक्कम पाय रोवला आहे. आताच कियाने सोरेस कार लाँच केली आहे. या कारला तिच्या लुक आणि मागच्या सीटवरील लोकांना देत असलेल्या आरामामुळे तुफान प्रतिसाद मिळत आहे. कियाने जानेवारी महिन्यात २५ हजार कार विकल्या आहेत. परंतू, याची एक बाजू अशीही आहे की कियाच्या या कारला एकही ग्राहक मिळालेला नाहीय.
कियाचा जानेवारीचा सेल पाहिला तर सोनेट ७०००, सेल्टॉस ६००० रुपये अशा संख्येने विकल्या गेल्या आहेत. परंतू कियाची पहिली वहिली ईलेक्ट्रीक कार EV6 ला मात्र ग्राहक मिळता मिळत नाहीय. कियाने एकतर ही महागडी कार आणली आहे. सध्या बाजारात टाटा, महिंद्राच्या तसेच एमजीच्या एकसोएक कार २०-३० लाखांच्या किंमतीत उपलब्ध आहेत. त्याच्या जवळपास दुप्पट कियाच्या या कारची किंमत आहे. ही कार दिसायला एकदम भारी असली, एकसोएक फिचर्स जरी असले तरी त्या कारकडे ग्राहक ढुंकूनही पाहत नसल्याची स्थिती आहे.
किया ईव्ही ६ मध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. सोबतच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरचा पर्याय आहे. 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टिम, ड्यूअल झोन क्लाइमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड आणि पावर्ड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जिंगसह सनरुफ सारखे फिचर्स या कारमध्ये आहेत. या कारची एक्सशोरुम किंमत 60.97 लाख रुपये आहे.
३६ तास चार्जिंगला लागतात...
जर ही कार 50 किलोवाट फास्ट चार्जरवर चार्ज केली तर ती १.१३ तासात ८० टक्के चार्ज होते. परंतू जर घरी चार्ज केली तर तिला पूर्ण चार्ज होण्यासाठी थोडे थोडके नाही ३६ तास म्हणजे दीड दिवस लागतो. या कारमध्ये 77.4kWh चे बॅटरी पॅक आहे, तसेच या चार्जवर 528 किलोमीटर पर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कियाने केलेला आहे.