अबब! जगातील सर्वात मोठी Hummer; भलामोठा आकार पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:55 PM2022-03-19T16:55:17+5:302022-03-19T16:56:01+5:30
Hummer H1 X3 चे मालक रेनबो शेख म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत ज्यांचे खरे नाव शेख हमद बिन हमदान अल नाहयान आहे.
हमर आधीपासून त्याच्या मोठ्या साईज आणि दमदार इंजिनमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या कारच्या मजबुतीमुळेच हमर H4 मॉडल अमेरिकन आर्मीत त्याचा वापर केला जातो. हे तगडं वाहन खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्यातील बाब नाही. कारण या वाहनाची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला हमरच्या अशा कारबद्दल सांगणार आहोत जे पाहणंही खूप कमी लोकांच्या नशिबी आहे.
ही Hummer ची H1 SUV आहे जी UAE मध्ये तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, ही जगातील सर्वात मोठी हमर गाडी आहे. अतिशय यूनिक या हमरला H1 X3 असं नाव देण्यात आले आहे. जे स्टँडर्ड हमरपेक्षा ३ पटीने मोठी आहे. ही शक्तिशाली SUV यावेळी UAE च्या ऑफ-रोड हिस्ट्री म्युझियममध्ये पाहायला मिळणार आहे. या हमरची उंची ६.६ मीटर आहे, तर त्याची लांबी १४ मीटर आणि रुंदी ६ मीटर ठेवण्यात आली आहे. ही एसयूव्ही केवळ दाखवण्यासाठी तिथे ठेवण्यात आलेली नाही, तर ती वेळोवेळी गाडी चालवताना दिसते.
या गाडीचा मालक जगभरात प्रसिद्ध
Hummer H1 X3 चे मालक रेनबो शेख म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत ज्यांचे खरे नाव शेख हमद बिन हमदान अल नाहयान आहे. कारबद्दलची त्याची आवड वेगळ्याच उंचीवर आहे. आणि त्याचे कार कलेक्शन पाहण्यासारखे आहे. रेनबो शेख यांच्याकडे मालमत्तेची कमतरता नाही, त्यामुळे वाहनांच्या शौकवर पैसे खर्च करताना त्यांना विचार करण्याची गरज नाही आणि ते वाहनांमध्ये वेळोवेळी मॉडिफिकेशन करत असतात.
कस्टम असली तरीही खऱ्या हमरसारखीच
Hummer H1 चे हे मॉडेल कस्टमाइझ केलेले असूनही ओरिजनल हमरसारखी दिसते. त्यावर केलेले काम खूपच भक्कम असून अमेरिकन सैन्यात वापरल्या जाणार्या हमर्समधून टायर घेतले गेलेत. मोठ्या आकाराच्या या हमरच्या आत बेडरूम, स्वयंपाकघर, स्नानगृह आणि जवळजवळ संपूर्ण घर बनवण्यात आले आहे.