ओला, एथरपेक्षाही या जगात अन्य इलेक्ट्रीक स्कूटर आहेत; पहा पर्याय...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:43 PM2024-01-16T15:43:11+5:302024-01-16T15:43:30+5:30
वाढलेले इंधनाचे दर लोकांना विचार करायला लावणारे आहेत. यामुळे लोकांनी ओला आणि एथर या कंपन्यांच्या स्कूटरवर उड्या मारल्या आहेत.
देशात दुचाकींची संख्या खूप आहे. यात आता इलेक्ट्रीक स्कूटरची भर पडली आहे. प्रत्येकजण त्याच्या वापराप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि बजेटप्रमाणे स्कूटर घेत असतो. परंतु, वाढलेले इंधनाचे दर लोकांना विचार करायला लावणारे आहेत. यामुळे लोकांनी ओला आणि एथर या कंपन्यांच्या स्कूटरवर उड्या मारल्या आहेत.
या दोनच स्कूटर बाजारात उपलब्ध नाहीएत. तर अन्यही कंपन्यांच्या स्कूटर चांगले परफॉर्म करत आहेत. रायडर सुपरमॅक्सचा टॉप स्पीड 60 किमी/तास आणि रेंज 100 किमी आहे. 160 मिमीच्या ग्राउंड क्लीयरन्ससह स्कूटरचे वजन 80 किलो आहे. रायडर सुपरमॅक्सची किंमत सध्या 79,999 रुपये आहे.
ओकाया फास्ट एफ4 ही हायस्पीड ई-स्कूटर आहे. एका चार्जवर 140 ते 160 किलोमीटरची रेंज मिळते. 60 ते 70 किमी/तास या वेगाने धावू शकते. Okaya Fast F4 ची सध्या दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1,37,990 रुपये आहे.
बजाज चेतक ही देखील विश्वसनीय स्कूटर आहे. 3.8 kWh इलेक्ट्रिक मोटरसह 3 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. या ई-स्कूटरची इको मोडमध्ये सिंगल चार्जवर 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये सिंगल चार्जवर 85 किमी चालते. बजाज चेतकची सध्याची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.44 लाख रुपये आहे.