टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 06:00 PM2017-09-13T18:00:00+5:302017-09-13T18:00:00+5:30

टायर चे महत्त्ल प्रत्येक वाहनाच्यादृष्टीने अनन्यसाधारण असून त्या टायरच्या आरोग्याकडे सतत लक्ष ठेवणे हे प्रत्येक कारचालक व मालकाचे महत्त्वाचे कर्तव्यच आहे. कारण तसे करण्याने त्याच्या सुरक्षिततेलाच त्यामुळे तो प्राधान्य देत असतो

There is a need to pay attention to tires consciously | टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

टायरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही सुरक्षिततेची गरज

Next
ठळक मुद्देसाधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतातविशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा

कार मालक आपल्या कारच्या टायर्सबाबत अनेकदा बेफिकिर असतात. किंबहुना बेफिकिर म्हणण्यापेक्षा कंजूषपणा करण्याचा त्यांचा अधिक प्रयत्न असतो. वास्तिवक कारसाठी त्या टायर्सचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे, हे अनेक लोक लक्षात घेत नाहीत. टायरमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेमे अतिशय गरजेचे आहे, हे कधी लक्षात येणार ते कळत नाही.त्यामुळे अनेकदा रिमोल्डिंगचे टायर वापरणारे अनेकजण दिसतात. विशेष करून ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागांमध्येही रिमोल्डिंग टायर वापरणारे कमी नाहीत. व्यावसायिक गाड्या किंवा सेकंडहॅण्ड कार घेऊन त्या भरपूर वापरणाऱ्यांमध्ये टायरकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करणारे अनेकजण दिसतात.

साधारण ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक रिमोल्डिंगचे टायर वापरतात. विशिष्ट काळ टायर वापरला गेला की तो फेकून द्यावा हे उत्तम. इतके वर्ष टायर वापरायचा व नंतरच तो काढायचा किंवा विशिष्ट काळ टायर वापरला की रिमोल्डिंग करून घेऊ म्हणजे आणखी जास्त काळ तो चालेल, अशी विविध प्रकारची मते लोकांमध्ये दिसून येतात. टायर ही कायम टिकणारी वस्तू नाही. तिची झीज होत असते. इतकेच नव्हे तर तुम्ही नुसता न वापरता वा फार न वापरता टायर कारला लावला तरी कालांतराने त्यावर परिणाम होत असतो, असे दिसून येते. यासाठी कारच्या टायरवर वेळोवेळी त्याच्या अलाईनमेंटकडे लक्ष द्या, त्याच्या बाह्य भागाची स्थिती पाहा, खराब रस्त्यांवरून चालवताना टायरमधील हवेचे प्रेशरही नीट आहे की नाही ते पाहा. खराब रस्त्यांवर वेगाने नेत कार वळवणे, सतत त्या चाकावर भार येईल अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणे हेही घोकादायक असते. ३ ते ५ हजार किलोमीटर झाल्यानंतर टायरचे रोटेशन करा.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या टायरला नीट वागणूक देत नाही, तोयपर्यंत तुम्हाला त्या कारपासून सुरक्षितताही नीट मिळू शकत नाही. आजकाल मोठ्या एक्स्प्रेस वे सारख्या रस्त्यांवर वेगाने कार नेणारे व टायरकडे लक्ष न देणारेही अनेक महाभाग दिसतात. टायर अशा प्रकारच्या रस्त्यांवर वेगमर्यादा ओलांडली गेली तर गरम झाल्याने फुटू शकतो, हे देखील लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे नियंत्रण जाणे, गाडी व्हॉबल होणे, स्टिअरिंगवर टायरचे प्रेशर खरे म्हमजे जाणवते तरीही लोकांना ते समजत नाही, ते समजून घ्या. टायर नीट ठेवले तरच कारचे आयुष्य व तुमची सुरक्षितताही वाढणार आहे हे पक्के लक्षात असू द्या.

Web Title: There is a need to pay attention to tires consciously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.