Maruti च्या या 3 कारनं दाखवला जलवा, केला असा कारनामा की बघतच राहीले Hyundai अन् Tata
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:17 PM2023-04-15T16:17:15+5:302023-04-15T16:17:46+5:30
जाणून घेऊयात मारुती सुझुकीच्या 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारसंदर्भात. विशेष म्हणजे, या केवळ मारुती सुझुकीच्याच नव्हे, तर देशभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत.
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. देशात मारुतीचे अनेक मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, मारुती ही कार विक्रीच्या बाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. मारुती सुझुकीने मार्च महिन्यात एकूण 1,37,201 कारची विक्री केली आहे. मार्च 2022 च्या तुलनेत आता कंपनीने 15 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. मात्र, कंपनीच्या टॉप सेलिंग कारमध्ये काही प्रमाणात बदलही बघायला मिळाला आहे. तर जाणून घेऊयात मारुती सुझुकीच्या 3 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारसंदर्भात. विशेष म्हणजे, या केवळ मारुती सुझुकीच्याच नव्हे, तर देशभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत.
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) -
मार्च महिन्यात स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. मार्च 2023 मध्ये मारुती स्विफ्टच्या एकूण 17,559 युनिट्सची विक्री झाली. जी मार्च 2022 मध्ये विकली गेली. 13,623 युनिट्सच्या तुलनेत 29 टक्के अधिक आहे. पण महिन्याचा विचार करता हिची विक्री 5 टक्के कमी राहिली. ही करा कंपनीच्या सर्वात यशस्वी कार पैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे, या कारने सर्व प्रकारच्या वयातील लोकांना आकर्षित केले.
मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki Wagonr) -
मार्च 2023 मध्ये WagonR च्या एकूण 17,305 युनिट्सची विक्री झाली. मार्च 2022 च्या तुलनेत यात 30 टक्के एवढी घसरण झाली आहे. मार्च 2022 मध्ये वॅगनआरच्या 24,634 युनिट्सची विक्री झाली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये, मारुतीने वॅगनआरच्या 16,889 युनिट्सची विक्री केली होती. यातुलनेत गेल्या महिन्यातील विक्री 2 टक्के अधिक आहे. मारुती वॅगनआर ही प्रथमच खरेदी करणाऱ्यां ग्राहकांमध्ये लोकप्रिय कार आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza) -
मारुती सुझुकी ब्रेझा ही मार्च महिन्यात कंपनीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. विशेष म्हणजे, याच बरोबर ब्रेजाने बेस्ट सेलिंग एसयूव्हीचा किताबही आपल्या नावे केला आहे. मारुतीने मार्च 2023 मध्ये ब्रेझाच्या 16,227 युनिट्सची विक्री केली.