Mid Size SUVs: या मिड साइज SUVची होतेय धडाक्यात विक्री, Scorpio पेक्षाही अधिक डिमांड; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:05 PM2022-10-27T17:05:47+5:302022-10-27T17:07:00+5:30
"बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सर्वाधिक असून मिड साइज एसयूव्ही सेगमेंटचीही जबरदस्त विक्री होत आहे."
भारतात SUV कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. त्या लोकांमध्येही प्रचंड लोकप्रीय होत आहेत. यामुळे एसयूव्हीच्या विक्रीतही मोठी वाढ बघायला मिळत आहे. बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सर्वाधिक असून मिड साइज एसयूव्ही सेगमेंटचीही जबरदस्त विक्री होत आहे. तर जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या मिड साइज SUV संदर्भात.
सप्टेंबर 2022 मध्ये ह्युंदाई क्रेटा या मिड-साइज एसयूव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे. एवढेच नाही, तर ते ह्युंदाईचे सर्वाधिक विकले गेलेले मॉडेलही आहे. अर्थात क्रेटा ही बऱ्याच दिवसांपासून ह्युंदाईची बेस्ट-सेलर आहे. गेल्या महिन्यात, ह्युंदाई क्रेटाचे 12,866 युनिटची विक्री केली होती. या कारच्या विक्रीत दर वर्षी 57 टक्यांची वृद्धी नोंदवली गेली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये Hyundai ने Creta SUV चे 8,193 यूनिट्स विकले होते. हिची किंमत 10.44 लाख रुपयांपासून ते 18.24 लाख रुपयांपर्यंत आहे.
Kia Seltos -
सप्टेंबर 2022 मध्ये दुसरी सर्वाधिक विकली जाणारी मिड-साइज एसयूव्ही म्हणजे किआ सेल्टोस. सेल्टोस ही ह्युंदाई क्रेटा प्रमाणेच आहे. महत्वाचे म्हणजे, या दोन्ही कार एक समान इंजिन आणि गियरबॉक्स पर्यांयांसह येतात. सप्टेंबर 2022 मध्ये किआने सेल्टोस एसयूव्हीचे 11,000 युनिट्स विकले. वार्षिक दृष्ट्या विचार करता ही 15 टक्क्यांची वाढ आहे.
Mahindra Scorpio -
तिसरी सर्वाधिक विकली जाणारी मिड साइज एसयूव्ही म्हणजे, महिंद्रा स्कॉर्पियो. खरे तर, हिच्या विक्रीच्या आकडेवारीत स्कॉर्पियो-एन आणि क्लासिकचा समावेश आहे. महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक ही महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या एसयूव्हींपैकी एक आहे आणि बोलेरोनंतरचे दुसरे सर्वात जुने मॉडेल आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, महिंद्राने स्कॉर्पियोच्या 9,536 युनिट्सची विक्री केली, तर सप्टेंबर 2021 मध्ये 2,588 युनिट्सची विक्री केली आहे. हिच्या विक्रीत 268 टक्क्यांची वाढ झाली आहे.