जुनी कार घेण्याच्या विचारात आहात?; त्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' पाच गोष्टी आणि टाळा नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:49 PM2021-05-09T17:49:59+5:302021-05-09T17:53:55+5:30

Tips for Buying used cars : सुरूवातीला शिकण्यासाठी किंवा बजेटसारख्या कारणांमुळे अनेकांचा कल हा सेकंड हँड कार घेण्याकडे असतो.

Thinking of buying an old car rom budget to type of vehicle keep these things in mind | जुनी कार घेण्याच्या विचारात आहात?; त्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' पाच गोष्टी आणि टाळा नुकसान

जुनी कार घेण्याच्या विचारात आहात?; त्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' पाच गोष्टी आणि टाळा नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देसुरूवातीला शिकण्यासाठी किंवा बजेटसारख्या कारणांमुळे अनेकांचा कल हा सेकंड हँड कार घेण्याकडे असतो.इंजिनपासून मालकाच्या माहितीपर्यंत अनेक बाबी तपासणं आवश्यक

आपण कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? भारतात नवीन कार खरेदी करणार्‍यांच्या संख्येपेक्षा सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. जुनी कार विकत घेणं खूपच स्वस्त आहे, त्याचवेळी त्याची किंमत नवीन कारपेक्षा कमी पडते. आपण सेकंड हँड कार खरेदी करण्याचे मन तयार केले असेल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. येथे आम्ही आपल्याला जुन्या कार खरेदी करताना लक्षात ठेवल्या जाणार्‍या ५ महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ.

कशी कार घ्यायचीये?

आपल्या गरजेनुसार आपल्याला कोणत्या प्रकारची कार घ्यायची आहे हे सर्वप्रथम आपण ठरवलं पाहिजे. न ठरवताच कार घेण्यास गेल्यास आपण अशीही कार घेऊ शकता जी आपल्या गरजाही पूर्ण करत नसेल. काही ग्राहकांना फक्त हॅचबॅक कार घ्यायची असते, काहींना फॅमिली कार पाहिजे असते तर काही ग्राहक एसयूव्ही कार्सना पसंती देतात.

किती आहे बजेट?

दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं बजेट. कारचा शोध सुरू करण्यापूर्वी, आपल्या गरजा आणि खिशानुसार बजेट ठरवा. बजेट निश्चित न करता तुम्ही गाडी घेऊन चुकीचा पर्याय निवडू शकता. सेकंड हँड कारचा एक फायदा म्हणजे आपल्याला जवळपास प्रत्येक बजेटमध्ये एक कार मिळते.

कारची तपासणी

जेव्हा आपल्याला एखादी कार आवडत असेल, तेव्हा ताबडतोब डील अंतिम करू नका. सर्वप्रथम कारची सखोल तपासणी करा. कदाचित कार बाहेरून चांगली दिसत असेल, परंतु त्याचं इंजिन तितकंसं चांगलं नसेल. कार किमान १० किमी तरी चालवणं आवश्यक आहे. आपल्या ओळखीचा एखादा मेकॅनिक असल्यास त्यांना आपल्या सोबत घेऊन जा.

तांत्रिक बाबींकडे लक्ष द्या

कारचं इंजिन तपासल्यानंतर त्याच्या Odometer, Speedometer आणि अन्य गोष्टींची माहिती करून घ्या. Odometer सोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड केली आहे का हेदेखील तपासून घ्या. किती किलोमीटर ती गाडी चालवण्यात आली आहे यावरदेखील त्या कारची किंमत अवलंबून असते. तसंच कारच्या बॉडीवर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅचेस नाहीत ना, याचीही तपासणी करून घ्या. 

कारची हिस्ट्री माहित करून घ्या

कारची हिस्ट्री माहित करून न घेणे ही एकप्रकारची मोठी चूक आहे आणि त्यापासून आपल्याला वाचलं पाहिजे. जर तुम्ही कोणत्या अधिकृत मोठ्या नावाजलेल्या कार डिलरकडून कार खरेदी करत असाल तर तुन्हाला कारचे रेकॉर्ड्स दाखवले जातील. परंतु तुम्ही व्यक्तिगत विक्रेते किंवा मालकाकडून कार खरेदी करत असाल तर त्याची हिस्ट्री माहित करून घ्या. तसंच त्याची कागदपत्रे पाहा आणि यापूर्वी त्या कारचे किती ओनर होते तेदेखील तपासा. इन्शुरन्स नंबरद्वारे तुम्ही अॅक्सिडेंट क्लेम आणि अन्य रेकॉर्डही तपासू शकता. 

Web Title: Thinking of buying an old car rom budget to type of vehicle keep these things in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.