Mahindra Thar घेण्याच्या विचारात आहात? आता १.०५ लाख अधिक खर्च करावे लागणार, कंपनीनं वाढवली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 03:54 PM2023-04-13T15:54:44+5:302023-04-13T15:59:18+5:30
महिंद्रा अँड महिंद्रानं आपली प्रसिद्ध ऑफरोड एसयुव्ही थारच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. वाचा काय आहे कारण.
महिंद्रा अँड महिंद्रानं त्यांच्या लोकप्रिय ऑफरोड एसयुव्ही थारच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आता ही SUV खरेदी करणं 1.05 लाखांपर्यंत महाग झालं आहे. थारला BS6 फेज-2 आणि RDE नॉर्म्समध्ये अपडेट करण्यात आलं आहे, ज्यामुळे याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर, थार X (O) हार्ड टॉप डिझेल MT RWD व्हेरिअंटची किंमत आता 55,000 रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, Mahindra Thar LX हार्ड टॉप डिझेल MT RWD व्हेरिअंट खरेदी करणं 1.05 लाख रुपयांपर्यंत महाग झालं आहे. एसयुव्हीच्या इतर मॉडेल्सच्या किमतीत 28,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
डिझेल व्हेरिअंटची नवी किंमत
महिंद्रा थार एसयुव्हीच्या (Mahindra Thar SUV) टॉप-स्पेक LX हार्ड टॉप डिझेल AT 4WD ची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 16.77 लाख रुपये झाली आहे. मात्र, कंपनीनं बेस व्हेरिएंटच्या किंमतीत बदल केलेला नाही. त्याची किंमत अजूनही 13.49 लाख रुपये आहे. कंपनी थारमध्ये नवीन व्हेरिअंट आणण्याचा विचार करत असल्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. लीक झालेल्या RTO दस्तऐवजानुसार, हे एंट्री-लेव्हल थार 4x4 AX (AC) व्हेरिअंट असेल. हे मॉडेल सध्याच्या AX (O) व्हेरिअँटपेक्षा लोअर मॉडेल असेल. या व्हेरिअंटमध्ये फ्रन्ट फेसिंग सेकंट रो सीट्स मिळण्याची शक्यता आहे. ही कार 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑफर केले जाणार असल्याची माहिती आहे.
2WD आणि 4WD च्या डिझाईनमध्ये फरक
डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर दोन्ही कार समोर उभ्या केल्या तर ओळखणं कठीण आहे. परंतु 2WD आणि 4WD मध्ये निरनिराळं बॅजिंग पाहायला मिळतं. दोन्ही कारचं फ्रन्ट आणि रिअर साईड व्ह्यू एकसारखाच आहे. 2WD मध्ये बॅजिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये मिळतं. दोन्हीमध्ये एकच मोठं अंतर आहे ते म्हणजे 2WD ला केवळ रिअर व्हिललाच पॉवर मिळते. परंतु 4WD ला सर्व व्हिल्सना पॉवर मिळते.