या स्वस्तातल्या छोट्या कारनं दाखवला मोठा दम, 700KG वजन घेऊन दिलं 18Kmpl मायलेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:44 PM2022-12-29T18:44:34+5:302022-12-29T18:45:10+5:30
टाटा पंचच्या या मालकाने केबिनमध्ये लाकडी आणि प्लास्टिकच्या टोकऱ्या ठेवल्या होत्या. त्यात संत्रं ठेवण्यात आली होती. याशिवाय कारमध्ये फळांनी भरलेले डबेही ठेवलेले होते. ही कार फळांनी पूर्णपणे भरण्यात आली होती.
आपण जेव्हा टाटा पंचचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात काय येते? चांगला ग्राउंड क्लिअरन्स आणि 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग असलेली कार. पण, आपण या कारचा विचार एक कमर्शिअल व्हेइकल म्हणून केला आहे का? आता आपल्या मनात येईल, की आम्ही हे काय बोलत आहोत. कारण ही एक पॅसेन्जर कार आहे. तर माध्यमांती काही वृत्तांनुसार, एका टाटा पंचच्या मालकाने या कारचा वापर कमर्शियल व्हेइकल म्हणून केला आहे. या व्यक्तीने कारमध्ये संत्र्याचे पेटारे भरले. याचे वजन एकूण 700 किग्रॅ एवढे होते. महत्वाचे म्हणजे, या वजनासह त्या व्यक्तीने ही कार तब्बल 125 किमीपर्यंत चावली. तसेच, या प्रवासात त्याला तब्बल 18 किमी प्रति लीटरचे मायलेज मिळाल्याचाही दावा केला जात आहे.
टाटा पंचच्या या मालकाने केबिनमध्ये लाकडी आणि प्लास्टिकच्या टोकऱ्या ठेवल्या होत्या. त्यात संत्रं ठेवण्यात आली होती. याशिवाय कारमध्ये फळांनी भरलेले डबेही ठेवलेले होते. ही कार फळांनी पूर्णपणे भरण्यात आली होती. एखाद्याने पॅसेन्जर कार अशा प्रकारे कमर्शिअल व्हेइकल म्हणून चालविणे घातक होऊ शकते. खरे तर कमर्शिअल गाडी कमर्शिअल अॅक्टिव्हिटीज लक्षात ठेवून तयार केल्या जात असतात. तर पॅसेन्जर कार तयार डिझाईन करताना वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते.
टाटा पंचची किंमत 6 लाख रुपये ते 9.54 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम दिल्ली). ही प्युअर, अॅडव्हेंचर, अकंप्लिश्ड आणि क्रिएटिव्ह सारख्या चार व्हेरिअंटमध्ये येते. हिचा काझीरंगा एडिशन आणि कॅमो एडिशनही येते. ही 5 सीटर कार आहे आणि गाडीमध्ये 366 लिटरचे बूट स्पेस देखील मिळते. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आते. जे 86 पीएस आणि 113 एनएम आउटपुट देते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचे ऑप्शन देखील मिळते.