यंदाच्या दिवाळीत केवळ २५०० रुपये मासिक EMI वर घेऊन या Hero Splendor; पाहा ऑफर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 03:36 PM2022-10-23T15:36:04+5:302022-10-23T15:36:23+5:30
तुम्हाला Hero MotoCorp बाईकवर ५००० रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. याशिवाय ८९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही Hero ची बाईक तुमच्या घरी आणू शकता
मुंबई - दिवाळीच्या सणावर अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स देत आहेत. Hero Motocorp भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी, तिच्या सर्वाधिक लोकप्रिय बाइक स्प्लेंडरसह (Hero Splendor) अनेक बाइक्सवर उत्तम ऑफर देत आहे. तुम्ही लक्ष्मी पूजन किंवा दिवाळीला बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिरोच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकता. कंपनी एक्सचेंज बेनिफिट्सपासून कॅशबॅकपर्यंतच्या ऑफर देत आहे. ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध असेल. Splendor व्यतिरिक्त, तुम्ही Passion आणि Xtreme वर ऑफर देखील घेऊ शकता.
तुम्हाला Hero MotoCorp बाईकवर ५००० रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. याशिवाय ८९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही Hero ची बाईक तुमच्या घरी आणू शकता. कंपनी फक्त रुपये २४९९ च्या मासिक EMI वर बाईक खरेदी करण्याची संधी देत आहे आणि तुम्ही या दिवाळीत शून्य व्याजदरात हिरोची मोटरसायकल तुमच्या घरी आणू शकता.
हिरो बाईक खरेदी केल्यावर, तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डवर पाच टक्के कॅशबॅक मिळेल. या फेस्टिव्ह सीझनमध्ये सर्व प्रकारच्या ऑफर्स देऊन ग्राहकांना बाईक खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कोविडनंतर आता ऑटोमोबाईल क्षेत्राचा व्यवसाय हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, दुचाकींच्या विक्रीत अद्यापही पूर्ण वेगाने वाढ झालेली नाही.
लॉन्च झाली नवीन स्प्लेंडर
हिरो स्प्लेंडर लोकांमध्ये 'जनता की मोटरसायकल' म्हणून लोकप्रिय आहे. Hero MotoCorp ने अलीकडेच त्याची नवीन आवृत्ती Hero Splendor + XTEC लाँच केली आहे. नवीन Hero Splendor + XTEC मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, फ्युएल इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जर, साइड स्टँड इंजिन कट- ऑफ आणि स्टॉप-स्टार्ट सिस्टीम सारखी नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध करुन दिले आहेत.
विक्री किती झाली?
Hero MotoCorp ने सप्टेंबर 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण ५,०७,६९० बाइक्स विकल्या आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये हा आकडा ५,०५,४६२ होता. हिरो मोटोकॉर्प ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी विक्री करणारी कंपनी आहे.