फक्त 7 रुपयांत तब्बल 100Km चालेल ही इलेक्ट्रिक बाईक! जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:53 PM2022-06-19T20:53:34+5:302022-06-19T20:55:02+5:30
electric motorcycle in cheapest price : ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक आहे. ही बाईक आपण केवळ ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता.
सध्या मोटारसायकल खरेदीपेक्षाही पेट्रोलच्या वाढत्या किमती हा अधिक चिंतेचा विषय बनला आहे. एक वेळ सामान्य माणूस हिंमत करून मोटारसायकसाठी मोठी रक्कम खर्च करेल, पण पेट्रोलच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतीने सामान्य नागरिकांच्या नाकात दम आलणला आहे. अशा परिस्थितीत आता इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.
सध्या, बाजारात अनेक वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहने सादर करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: दुचाकी सेग्मेंटमध्ये या कंपन्या अधिक आहेत. काही दिग्गज कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स तर सादर करत आहेतच, पण स्टार्टअप्स देखील यात मागे नाहीत. हैदराबाद येथील स्टार्टअप Atumobile Pvt Ltd च्या Atum 1.0 इलेक्ट्रिक बाईकबद्दल बोलायचे झाल्यास, तिची सुरुवातीची किंमत रु 74,999 (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही बाईक आपण केवळ ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता.
अशी आहे इलेक्ट्रिक बाईक -
ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमाने संपूर्ण देशात उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकमध्ये पोर्टेबल लिथिअम-आयऑन बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास केवळ चार तास लागतात. महत्वाचे म्हणजे, ही बाईक सिंगल चार्जमध्ये 100 किलो मीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
या बाईकच्या बॅटरीला 2 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या बाईकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, हिला चालवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही. या बाईकची टॉप स्पीड कमीत कमी ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये 6 किलोग्रॅमची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास केवळ 1 युनिट एवढीच वीज लाकते. यासाठी आपल्याला सामान्यपणे केवळ 6 से 7 रुपये एवढाच खर्च करावा लागेल. यानुसार, ही बाईक केवळ 7 रुपयांत 100 किलो मीटरपर्यंतची रेंज देईल.