याला म्हणतात कॉन्फिडन्स! मारुती सुझुकीने भारत एनकॅपमध्ये कारच्या टेस्टिंगसाठी अर्ज केला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:28 PM2024-04-10T18:28:31+5:302024-04-10T18:29:10+5:30
ग्लोबल एनकॅपमध्ये मारुतीच्या बहुतांश कारना झिरो स्टार मिळालेला आहे. अनेकदा GNCAP ने आवाहन करूनही मारुती सुरक्षित कार बनवू शकली नव्हती.
गेल्या वर्षीच्या अखेरीस कारसाठी भारतात भारत एनकॅप सेफ्टी रेटिंग देणारी संस्था सुरु करण्यात आली आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये टाटाने बहुतांश कारना फाईव्ह स्टार रेटिंग मिळविली होती. टाटाच्या काही कार या भारत एनकॅपमध्येही फाईव्ह स्टार घेऊन आल्या आहेत. आता देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीनेही त्यांच्या कारची क्रॅश टेस्ट करण्यासाठी अर्ज केला आहे.
ग्लोबल एनकॅपमध्ये मारुतीच्या बहुतांश कारना झिरो स्टार मिळालेला आहे. अनेकदा GNCAP ने आवाहन करूनही मारुती सुरक्षित कार बनवू शकली नव्हती. अखेर आता भारताच्या गरजेनुसार सेफ्टी रेटिंगची चाचणी सुरु झाली आहे. देशात अपघाती मृत्यूंची संख्या वाढत चालल्याने केंद्र सरकारने ही संस्था सुरु केली आहे.
या BNCAP मध्ये मारुतीने अर्ज केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. टाटा नंतर आता मारुती यामध्ये कार सेफ्टी रेटिंग तपासणार आहे. आतापर्यंत भारतात महिंद्रा, ह्युंदाई, फोक्सवॅगन, स्कोडाच्या कारना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे.
मारुतीच्या बऱ्याचशा कारना कमी सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. एकमेव जुनी ब्रेझाला ग्लोबल एनकॅपमध्ये फोर स्टार मिळालेले आहेत. आताच्या ब्रेझाची अद्याप टेस्ट झालेली नाही. यामुळे मारुती चाचणीसाठी कोणत्या कार पाठविते आणि कोणत्या कारला किती रेटिंग मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.