Maruti Brezza पेक्षाही अधिक विकली जातेय ही 6 लाख रुपयांची SUV, अशी आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 02:40 PM2022-12-06T14:40:25+5:302022-12-06T14:41:04+5:30

नोव्हेंबर 2022 दरम्यान एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सनची सर्वाधिक विक्री झाली आहे. हिच्या 15,871 युनिट्सची विक्री झाली आहे.

This Rs 6 lakh SUV is selling even more than the Maruti Brezza maruti brezza on 4th place in top 5 selling suv | Maruti Brezza पेक्षाही अधिक विकली जातेय ही 6 लाख रुपयांची SUV, अशी आहे खासियत

Maruti Brezza पेक्षाही अधिक विकली जातेय ही 6 लाख रुपयांची SUV, अशी आहे खासियत

Next

भारतात नोव्हेंबर महिन्यात विकल्या गेलेल्या टॉप-10 कारमध्ये Maruti Baleno ही क्रमांक एकवर आहे. या कारच्या 20,945 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Tata Nexon (15,871 युनिट्स), तिसऱ्या क्रमांकावर Maruti Alto (15,663 युनिट्स), चौथ्या क्रमांकावर Maruti Swift (15,153 युनिट्स), पाचव्या क्रमांकावर Maruti Wagon R (14,720 युनिट्स), सहाव्या क्रमांकावर Maruti Dzire (14,456 युनिट्स), सातव्या क्रमांकावर Maruti Ertiga (13,818 युनिट्स), आठव्या क्रमांकावर Hyundai Creta (13,321 युनिट्स), नव्या क्रमांकावर Tata Punch (12,131 युनिट्स), तर दहाव्या क्रमांकावर Maruti  Brezza (11,324 युनिट्स) आहे.

केवळ सर्वाधिक विकल्या गेलेल्या एसयूव्हीचा विचार केल्यास, त्यातही मारुती ब्रेझा फार खाली आहे. ही कार चौथ्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर 2022 दरम्यान एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा नेक्सनची सर्वाधिक विक्री झाली आहे. हिच्या 15,871 युनिट्सची विक्री झाली आहे. हिची किंमत 7.70 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारनंतर, दुसरा क्रमांक लागतो, ह्युंदाई क्रेटाचा. गेल्या महिन्यात हिच्या 13321 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच, नोव्हेबर 2021 मध्ये हिच्या केवळ 10,300 युनिट्सचीच विक्री झाली होती. तर, तिसऱ्या क्रमांकावर टाटा पंचचा क्रमांक लागतो. गेल्या महिन्यात हिच्या 12,131 युनिट्सची विक्री झाली आहे. टाटा पंच लॉन्च होऊन अद्याप एकच वर्ष झाले आहे आणि बिक्रीच्या बाबतीत हिने ब्रेझालाही मागे टाकले आहे.

टाटा पंचची किंमत केवळ 6 लाख रुपयांपासून सुरू होते. हिचे टॉप व्हेरिअंट 9.54 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. ही कार ब्रेझाच्या तुलनेत स्वस्त, छोटी आणि कमी फीचर्स असलेली आहे. मात्र, हिची जबरदस्त विक्री सुरू आहे. टाटा पंचमध्ये मारुती ब्रेझाच्या तुलनेत छोटे इंजिन मिळते. ब्रेझामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. तर पंचमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. हिचे इंजिन 86 पीएस/113 एनएम टार्क जनरेट करू शकते. इंजिनसोबतच हिला 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स (ऑप्शनल) आहेत.
 

Web Title: This Rs 6 lakh SUV is selling even more than the Maruti Brezza maruti brezza on 4th place in top 5 selling suv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.