Ola Electric Scooters वर हजारो रुपयांची सूट; या ३ मॉडेल्सवर होईल मोठी बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:08 PM2024-09-07T12:08:11+5:302024-09-07T12:08:43+5:30
Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकची ही ऑफर काही शहरांमध्येच उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर हजारो रुपये वाचवू शकता. प्रोडक्ट डिस्काउंट व्यतिरिक्त कंपनी Ola S1 Pro, Ola S1X आणि Ola S1X Plus स्कूटरवरही उत्तम ऑफर देत आहे.
विशेष म्हणजे या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. ओला गणेश चतुर्थी ऑफर (Ola Ganesh Chaturthi Offer) आज (7 सप्टेंबर) संपणार आहे. तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या ओला इलेक्ट्रिक डीलरकडे जाऊन तुम्ही स्कूटर बुक करू शकता. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकची ही ऑफर काही शहरांमध्येच उपलब्ध आहे.
Ola S1 Pro Discount
ओला एस १ प्रो (Ola S1 Pro) ची किंमत १,३४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि या प्रो व्हेरिएंट इलेक्ट्रिक स्कूटरवर पाच हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटचा लाभ ओडिशा, केरळ, बंगळुरू, छत्तीसगड, म्हैसूर, मालेगाव, बेळगाव, नांदेड, कल्याण, परभणी, औरंगाबाद, बिदर, नागपूर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, नाशिक, ग्वाल्हेर, जयपूर, बरेली, मेहसाणा, दुर्ग, तिरुपती, पाटणा, सिवान, कोलकाता, उन्नाव, उदयपूर, दिब्रुगड, मुरादाबाद, झाझर, सिरोही, बालाघाट, अहमदाबाद, जुनागढ, राजकोट, सुरत, लखनौ, रायपूर, मेरठ आणि चंदीगड यासारख्या शहरांमध्ये मिळत आहे.
Ola S1X आणि S1X Plus पर सुद्धा सूट
ओला ए १ प्रो प्रमाणे, ओला एस १ एक्स (4kWh व्हेरिएंट) आणि एस १ एक्स प्लस मॉडेल्सवर देखील पाच हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे १, ०१,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आणि ८९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी केल्या जाऊ शकतात. या दोन्ही मॉडेल्सवर कुठे सवलत उपलब्ध आहे, याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
Ride into a season of savings, this Ganesh Chaturthi. Get the Ola S1 and get flat ₹5000 off, benefits up to ₹23,000 and more!
— Ola Electric (@OlaElectric) September 4, 2024
Link 👉 https://t.co/unWD1KESLOpic.twitter.com/C5symcdmXW
दरम्यान, ओला एस १ प्रो खरेदी करताना तुम्ही तुमची जुनी दुचाकी एक्सचेंज केल्यास तुम्हाला १२ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय, एस १ एक्सवर (4kWh व्हेरिएंट) आठ हजार रुपयांचा बोनस दिला जात आहे. तसेच, तुम्हाला IDFC, RBL, Federal, Yes आणि One कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर ५ टक्के (५ हजार पर्यंत) सूट मिळेल, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे पेमेंट कराल तेव्हाच या ऑफरचा लाभ मिळेल. हे लक्षात घ्या ऑफर ९ महिने आणि त्याहून अधिक कालावधीसाठी आहे.