टायरच्या रिमवरही नेहमी बारकाईने लक्ष असायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 12:42 PM2017-09-11T12:42:55+5:302017-09-11T12:46:16+5:30

कारचा टायर ज्या धातूच्या चक्राकार भागावर बसवला जातो, त्याला रिम वा व्हील रिम असे म्हणतात. या व्हील रिमची सातत्याने पाहाणी, तपासणी करीत राहाणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे.

The tire rim should always be inspected | टायरच्या रिमवरही नेहमी बारकाईने लक्ष असायला हवे

टायरच्या रिमवरही नेहमी बारकाईने लक्ष असायला हवे

ठळक मुद्देट्यूबलेस टायर हा रिमवर अतिशय चपखलपणे बसलेला असतोत्यामध्ये हवा भरली जाते व ट्यूब नसली तरी रिमवर तो टायर इतका घट्ट असतो, की त्यामुळे टायरमधील हवा बाहेर जात नाहीत्यामुळे चाकाला असणारा हा रिम व त्याचे दोन्ही भाग हे नीट आहेत की नाहीत, हे नेहमी लक्षपूर्वक तपासा

वैयक्तिक वापरासाठी मोटार घेणाऱ्या अनेकांना आपल्या कारची, मोटारीची फार काळजी नसते. काही वेळा ते स्वतः त्यासंबंधात फार विचारही न करता सारे काही मेकॅनिकवर सारी जबाबदारी टाकून मोकळे होतात. तसे करणे बरोबर नाही. कारी वा मोटार तुमच्या मालकीची असल्याने व ती तुम्ही तुमच्या व तुमच्या कुटुंबासाठी वापरीत असल्याने मोटारीची काळजी घेणे ही बाब कार मालक म्हणून प्राधान्याने तुमची जबाबदारी असते. दुसरी बाब प्रवासात काही समस्या उद्भवली तर प्रत्येकवेळी काही तुम्ही तुमच्या मेकॅनिककडे जाऊ शकणार नाही की त्याच्याशी फोनवरून संपर्कही साधू शकाल याची खात्री नसते. यासाठी अनेक बाबी या तुमच्या तुम्ही शिकून व समजून घेणे गरजेचे आहे. कारच्या चाकांचे रिम वा व्हील रिम हा त्यातीलच एक महत्त्वाचा भाग आहे.

कारला चालणारी चार चाके असतात व एक चाक हे स्टेपनी म्हणून तुमच्या कारच्या डिक्कीमध्ये वा अन्य कुठे कंपनीने सोय केल्यानुसार लावलेले असते. या चाकामध्ये टायर,ट्यूब असेल तर, व्हॉल्व, रिम, चार नट हे सर्वसाधारण भाग आहेत. त्यामध्ये रिम म्हणजे धातूचे एक चक्र असते. त्याला दोन भाग असतात. एक पुढचा व एक त्याला संलग्न असणारा मागचा भाग. या दोन्हींची जुळवणूक केलेली असते व त्यामध्ये तुमचा ट्यूबलेस टायर,त्याचा व्हॉल्व बसवून नटद्वारे तो टायर त्या रिममध्ये बसवलेला असतो.

ट्यूबलेस टायर या रिमवर अतिशय चपखलपणे बसलेला असतो, त्यामध्ये हवा भरली जाते व ट्यूब नसली तरी रिमवर तो टायर इतका घट्ट असतो, की त्यामुळे टायरमधील हवा बाहेर जात नाही, त्या टायरचे तसे वैशिष्ट्य असते. तसेच त्या रिमचेही हे वैशिष्ट्य असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे चाकाला असणारा हा रिम व त्याचे दोन्ही भाग हे नीट आहेत की नाहीत, हे नेहमी लक्षपूर्वक तपासा. त्याला कुठे दगड बसून वा रस्त्यावर नकळत आपटला जाऊन जर रिमचा आकार बिघडला असेल तर तो वेळीच नीट करून वा बदलून घेण्याची तसदी घ्यावी. साधारणपणे रिम हा स्टीलमध्ये व अलॉय स्वरूपात असतो. स्टीलमधील रिमला वाकडे होण्याचास आपटून त्याचा आकार बिघडण्याचाही धोका असतो. अलॉय व्हील म्हणून आपण ज्या रिमकडे बघतो तो प्रकार खूप वेगळा असतो. अॅल्युमिनियम वा मॅग्नेशियम याद्वारे ते तयार केलेले असते. तर स्टील रीम हे स्टिल शीट मेटलद्वारे तयार केलेले असते. अलॉय व्हील हे कास्टिंग केलेले असते. ते वाकण्याचा फार धोका नसतो, ते तसे खूप मजबूत असते. त्यावर बसणारा टायर हा साधारण मोटार उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या टायरपेक्षा थोडा मोठाही असू शकतो. विशेष म्हणजे हा टायर बसताना थोडा अधिक रूंदावत असल्याने तुम्हाला बेस चांगला मिळतो. मात्र फार मोठा धक्का बसला तर अलॉयव्हील रिम क्रॅक जाऊन वा तुटण्याचाही धोका असतो मात्र तो वाकडा होत नाही. त्यामुळे खराब झाला तर अलॉय व्हील फेकून देण्याविना उपाय नसतो.

रिमवर तुमच्या कारचा टायर बेतलेला असल्याने या रिमची काळजी न निगा तसेच देखभाल नेमाने करावी. त्याच्याकडे किमान महिन्याभरातून तरी नजर टाका, त्याचा व्हॉल्व नीट आहे की नाही ते ही पाहा. त्याचा आकार वा त्याला कुठे फटका बसलेला नाही हे ही नेहमी लक्षपूर्वक पाहा व त्याबाबत योग्यवेळी येग्य ती काळजी घ्या. काही झाले तरी त्या रिमवरच तुमच्या टायरचे काम असणार आहे. परस्परांशी संबंधित असे हे घटक असल्याने त्यांची निगा, पाहाणी व तपासणी हे होणे नेहमी गरजेचे आहे.तुमच्या सुरक्षिततेचीच ती एक तपासणी असते.

Web Title: The tire rim should always be inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.