डेमो कार खरेदी करायची की नाही? स्वस्त मिळाली तरी जाणा फायदा, नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 03:15 PM2023-04-20T15:15:12+5:302023-04-20T15:15:28+5:30
एक फायदा असा असतो की, जुन्या कारच्या किंमतीत नवीन कार मिळते. कारची किंमत जुन्या कारपेक्षा थोडी जास्त असते. पण तोटा...
अनेकदा कार कंपन्यांचे डीलर त्यांच्याकडील डेमो कार विकायला काढतात. या कारना टेस्ट ड्राईव्ह कार असे देखील म्हणतात. या कार म्हणजे शोरुमवाल्यांकडून ग्राहकांना चालवून पाहण्यासाठी असतात. या कार वापरून झाल्या की त्या विकतात. काही कमी किंमतीला कार विकली जात असली तरी त्यात घेणाऱ्याचा फायदा असतो की नुकसान?
एक फायदा असा असतो की, जुन्या कारच्या किंमतीत नवीन कार मिळते. कारची किंमत जुन्या कारपेक्षा थोडी जास्त असते. शिवाय डीलरकडून त्यावर वॉरंटी, फ्री सर्व्हिसही दिली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे या कार आरटीओकडे रजिस्टर केलेल्या नसतात. यामुळे या कारचा पहिला मालक हा ती कार विकत घेणारा ठरतो. म्हणजेच ती कार पुन्हा विकायची झाली तर डिप्रिसिएशनचा फटका बसत नाही.
यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे कारचे बाजारमूल्य अबाधित राहते आणि त्याच्या नावावर दुसरा मालक आल्यास त्याचा निश्चितच फटका बसतो. डेमो कार या सेकंड हँड कारपेक्षा कमी चालविलेल्या असतात. डेमो कारही टॉपचे व्हेरिअंट असते. डीलरही ती कार चांगली मेन्टेन ठेवत असतो.
नुकसान...
डेमो कार जुन्या कारपेक्षा जास्त किंमतीला विकली जाते. तसेच तिला वापरणारे अनेकजण असतात. त्यांनी टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली सस्पेंशन, पिकअप सारख्या गोष्टी तपासून पाहिलेल्या असतात. यामुळे या गोष्टींचा फटका बसू शकतो. सस्पेंशनचे किंवा गिअरबॉक्स, इंजिनचे काम निघू शकते.
नवीन कारपेक्षा कमी कालावधीची वॉरंटी मिळते, ती देखील डीलरशीपकडून. यामुळे एखादी मोठा समस्या आली आणि डीलरने हात वर केले तर कंपनी तुम्हाला साथ देत नाही.
अनेकदा कार कंपन्या त्यांच्या कार तीन वर्षांनी अपग्रेड करतात. यामुळे नवीन डिझाईनची कार आली की डीलर त्यांच्याकडील डेमो कार विकून टाकतात. असे झाल्याने तुम्हाला जुनी कार मिळू शकते. जी तुम्ही विकायला गेलात तर तिचे तेवढे बाजारमुल्य देखील येत नाही.