बाबोssss .... 'या' स्वस्त कारपुढे Maruti-Tata चं 'मीटर डाऊन'; विक्रीमध्ये १६ हजार टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:50 PM2023-02-25T12:50:04+5:302023-02-25T12:50:38+5:30

सर्वाधिक निर्यात केलेल्या ५ कार्सच्या यादीत या नावाने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

top 10 car export renault kiger registered 16811 percent growth compared to Maruti Tata cars | बाबोssss .... 'या' स्वस्त कारपुढे Maruti-Tata चं 'मीटर डाऊन'; विक्रीमध्ये १६ हजार टक्के वाढ

बाबोssss .... 'या' स्वस्त कारपुढे Maruti-Tata चं 'मीटर डाऊन'; विक्रीमध्ये १६ हजार टक्के वाढ

googlenewsNext

Top 5 Car Export: भारत ही कार खरेदी-विक्रीबाबत जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. येथे कारचे उत्पादन देखील होते आणि आपल्या देशातून परदेशात कारची निर्यातही केली जाते. भारतातील कारच्या विक्रीच्या दृष्टीने मारुती सुझुकी ऑल्टो प्रथम क्रमांकावर आहे. पण, जेव्हा परदेशात कारच्या निर्यातीचा विचार केला जातो, तेव्हा मात्र हे चित्र पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसते. जर आपण ५ सर्वाधिक निर्यात केलेल्या कारबद्दल बोलत असू तर त्या यादीमध्ये सध्या एक अशी कार चर्चेत आहे, ज्या नावाने प्रत्येकाला आश्चर्यचकित केले. या स्वस्त कारच्या निर्यातीत थेट १६,८११ टक्के वाढ झाली आहे.

निर्यातीतील टॉप ५ कार

जानेवारी २०२३ मध्ये कार निर्यातीत सकारात्मक वाढ दिसून आली आहे. जानेवारी २०२२ च्या तुलनेत कारच्या निर्यातीत ३६.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) ही सर्वाधिक निर्यात केलेली कार आहे. त्याची विक्री ३,६८४ युनिट्स आहे. जानेवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १,६९४ युनिट्सपेक्षा ही विक्री ११७.४७ टक्के जास्त आहे. पण या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या Renault Kiger एसयूव्हीने निर्यातीत मोठी वाढ नोंदविली आहे. जानेवारी २०२३ मध्ये या कारची निर्यात १६,८११.११ टक्क्यांनी वाढून ३,०४४ युनिट्सवर गेली. जानेवारी २०२२ मध्ये या कारची केवळ १८ युनिट्सचीच निर्यात झाली होती.

Kiger चे वैशिष्ट्य

भारतात Renault Kiger ची किंमत ६.५० लाख रुपये ते ११.२३ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. त्यात जास्तीत जास्त पाच लोक बसू शकतात. त्याची बूट स्पेस ४०५ लिटर आहे. ही कार दोन इंजिन पर्याय, 1-लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (72 पीएस/96 एनएम) आणि 1-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन (100PS/160Nm) सह उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांबाबत बोलायचे झाल्यास, किगरला वायरलेस Android Auto और Apple CarPlay, 7 इंचाचा डिजिटल ड्राइव्हर डिस्प्ले, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि DRL सह LED हेडलाइट्स आणि 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे. यात वायरलेस फोन चार्जर, क्रूझ कंट्रोल (केवळ टर्बो व्हेरिएंट्सला) आणि पीएम 2.5 एअर फिल्टर (सर्व प्रकारांच्या मॉडेल्सना) देखील आहे.

Web Title: top 10 car export renault kiger registered 16811 percent growth compared to Maruti Tata cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.