Mahindra Thar सह 'या' 10 कारवर मिळतोय 2.5 लाखांपर्यंत डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 07:34 PM2023-02-24T19:34:01+5:302023-02-24T19:34:49+5:30

ही ऑफर फेब्रुवारीसाठी वैध आहे. दरम्यान, सर्वात जास्त ऑफर्स असलेल्या 10 कारची लिस्ट पाहा, त्यात महिंद्रा थारचाही समावेश आहे.

top 10 car with highest discounts offer in february mahindra thar | Mahindra Thar सह 'या' 10 कारवर मिळतोय 2.5 लाखांपर्यंत डिस्काउंट!

Mahindra Thar सह 'या' 10 कारवर मिळतोय 2.5 लाखांपर्यंत डिस्काउंट!

googlenewsNext

नवी दिल्ली : टाटा, महिंद्रा आणि जीपसह अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारवर चांगल्या ऑफर देऊन वर्ष 2023 ची सुरुवात केली आहे. कारवर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफरही मिळत आहेत. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सवलत शहर आणि डीलरशिपच्या आधारावर वेगवेगळी असू शकते. ही ऑफर फेब्रुवारीसाठी वैध आहे. दरम्यान, सर्वात जास्त ऑफर्स असलेल्या 10 कारची लिस्ट पाहा, त्यात महिंद्रा थारचाही समावेश आहे.

जीप मेरिडियनवर सर्वाधिक सवलत
दिल्लीतील काही डीलरशिप मेरिडियनवर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर देत आहेत. यासोबतच कम्पासवर 1.7 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळत आहेत. दरम्यान, मेरिडियनची भारतीय बाजारपेठेत टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner), स्कोडा कोडिएक आणि फॉक्सवॅगन टिगुआन बरोबर स्पर्धा आहे.

टाटा सफारीवरही मोठी ऑफर
दिल्ली-एनसीआरमधील काही डीलर्स टाटा सफारी एसयूव्हीवर 1.25 लाख रुपयांपर्यंत बेनिफिट्स ऑफर देत आहेत. दरम्यान, अलीकडेच टाटा मोटर्सने नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीच्या नवीन रेड डार्क एडिशन लॉन्च केल्या आहेत, ज्यामध्ये नवीन फीचर्स, मोठी टचस्क्रीन सिस्टम आणि ADAS फीचर्स ऑफर करण्यात आली आहेत.

सर्वाधिक सवलतीच्या ऑफर असलेल्या कार
1. Jeep Meridian- 2.5 लाख रुपये
2. Jeep Compass- 1.7 लाख रुपये
3. Tata Safari- 1.25 लाख रुपये
4. Skoda Kushaq, VW Taigun- 1.25 लाख रुपये
5. Tata Harrier- 1.2 लाख रुपये
6. Hyundai Alcazar- 1.2 लाख रुपये
7. Kia Seltos- 1.07 लाख रुपये
8. Mahindra Thar- 1 लाख रुपये
9. Honda City- 70,000 से 1 लाख रुपये
10. Hyundai Verna- 1 लाख रुपये

Web Title: top 10 car with highest discounts offer in february mahindra thar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.