Top 10 long Waiting Period Cars : ‘या’ १० कार्सवर १८ महिन्यांपर्यंतचं वेटिंग, कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर पाहा ही लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 03:01 PM2023-04-20T15:01:27+5:302023-04-20T15:24:26+5:30
जर तुम्ही एप्रिलमध्ये SUV किंवा MPV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा वेटिंग पीरिअडदेखील माहीत असला पाहिजे.
जर तुम्ही एप्रिलमध्ये SUV किंवा MPV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा वेटिंग पीरिअडदेखील माहीत असला पाहिजे. एकीकडे वाहनांची मागणी आणि दुसरीकडे चिप्सची कमतरता यामुळे त्यांचा वेटिंग पीरिअडही वाढला आहे. अनेक मॉडेल्सचा वेटिंग पीरिअड 18 महिन्यांपर्यंत म्हणजेच दीड वर्षांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, जर तुम्ही एप्रिल 2023 मध्ये कार बुक केली तर त्याची डिलिव्हरी ऑक्टोबर 2024 मध्ये मिळेल. मात्र, काही कार्सवर हा वेटिंग पीरिअड सहा महिन्यांचा आहे. म्हणजेच, तुम्ही आजच बुक केल्यास तुम्हाला त्यांची डिलिव्हरी ऑक्टोबर 2023 मध्ये मिळेल. पाहुया कोणत्या अशा १० कार्स आहेत ज्यांचा वेटिंग पीरिअड सर्वाधिक आहे.
टोयोटा हायक्रॉसवर 18 महिन्यांपर्यंतचा वेटिंग पीरिअड सुरू आहे. दुसरीकडे, टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरच्या एंट्री-लेव्हल E माईल्ड हायब्रीड एमटी ट्रिमसाठी 12 ते 15 महिन्यांचा वेटिंग पीरिअड आहे. तर S आणि G माईल्ड हायब्रीड MT व्हेरिअंटसाठी 8 ते 10 महिने वाट पाहावी लागेल. CNG व्हेरिअंटसाठी वेटिंग पीरिअड 3 ते 4 महिने आहे, तर AT माईल्ड हायब्रिड व्हेरिअंटसाठी 12 महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. बेस एस हायब्रिडवर 10 ते 12 महिने त्याच वेळी G व्हेरिअंटवर 8 ते 10 महिने आणि V वर 8 महिन्यांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे.
महिंद्र स्कॉर्पिओच्या निवडक व्हेरिअंटसाठी 15 महिन्यांचा वेटिंग पीरिअड आहे. Kia Carens आणि Mahindra XUV700 साठी तुम्हाला 15 महिने, मारुती सुझुकी ब्रेझासाठी 10 महिन्यांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे. Kia Sonet च्या ठराविक व्हेरिअंटसाठी वेटिंग पीरिअड 9 महिन्यांपर्यंत आहे. Hyundai Creta च्या सिलेक्टेड व्हेरिअंटसाठी वेटिंग पीरिअड 8 महिन्यांपर्यंत तर मारुती सुझुकी ग्रँड विटारासाठी वेटिंग पीरिअड 6 महिन्यांपर्यंत आहे.