भारतात लवकरच लाँच होणार 'या' 3 स्वस्त इलेक्ट्रिक कार; कमी बजेटमध्ये मिळतील मजबूत फीचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:32 PM2022-09-23T13:32:21+5:302022-09-23T13:32:58+5:30
electric cars in india : सध्या बहुतांश इलेक्ट्रिक कारच्या किमती 10 लाखांपेक्षा जास्त असल्या तरी लवकरच अनेक स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होणार आहेत.
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत हळूहळू इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय, अनेक कंपन्या सुद्धा इलेक्ट्रिक कार विकत आहेत. सध्या बहुतांश इलेक्ट्रिक कारच्या किमती 10 लाखांपेक्षा जास्त असल्या तरी लवकरच अनेक स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा तीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात दाखल होणार आहेत, ज्यांची किंमत जवळपास 10 लाख रुपये असणार आहे. दरम्यान, आम्ही लाँच होणार्या 3 स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल सांगत आहोत. यामध्ये टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV), एजी मोटरची परवडणारी इलेक्ट्रिक कार आणि सिट्रोएन सी 3 ( Citroen C3) च्या इलेक्ट्रिफाइड व्हर्जनचा समावेश आहे.
Tata Tiago EV
टाटा मोटर्स 28 सप्टेंबर रोजी भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्हीचे अनावरण करणार आहे. यामध्ये टाटा टिगोर ईव्हीसारखी पॉवरट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे. टियागो ईव्हीमध्ये 26 kWh ची लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे सिंगल चार्जवर 302 ची रेंज देते. टियागो ईव्ही लाँच झाल्यावर तिची एक्स-शोरूम किंमत जवळपास 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
MG motors india electric car
एमजी मोटर इंडियाने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, 2023 च्या पहिल्या सहामाहीत कंपनी स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. मात्र ही इलेक्ट्रिक कार कोणती असेल हे कंपनीने सांगितलेले नाही. त्याची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये असू शकते. एमजीचे नवीन इलेक्ट्रिक सध्याच्या ZS EV पेक्षा लहान असेल. सिंगल चार्जवर 250-300 किमीची रेंज असल्याची शक्यता आहे.
Citroen C3 EV
सिट्रोएन इंडिया 2023 च्या पहिल्या तिमाहीत C3 सब-कॉम्पॅक्ट SUV चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करणार आहे. या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत 10 लाख ते 12 लाख रुपये एक्स-शोरूम असण्याची शक्यता आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये या कारचे लाँचिंग केले जाऊ शकते. Citroen C3 EV ला ग्लोबल-स्पेक Peugeot e-208 प्रमाणेच 50 kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. ही सिंगल चार्जवर 300-350 किमीची रेंज देऊ शकते.