Top Demanding Car: 'या' छोट्या आणि सस्त कारला आली डिमांड, विक्रीत झाली तब्बल 10 पट वाढ! जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 08:11 PM2022-10-24T20:11:46+5:302022-10-24T20:13:13+5:30
देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कार पैकी, कोणत्या कारची मागणी सर्वाधिक वाढली? यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ती कारही मारुती सुझुकीचीच आहे.
मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी आहे. दर महिन्याला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीतही मारुती सुझुकीच्या मॉडेल्सचेच वर्चस्व असते. एवढेच नाही, तर या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेली कारही मारुती सुझुकीचीच असते. आपण सप्टेंबर महिन्याचा विचार केल्यास, या महिन्यात मारुती सुझुकी अल्टोची सर्वाधिक विक्री झाली.
याच बरोबर, देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कार पैकी, कोणत्या कारची मागणी सर्वाधिक वाढली? यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ती कारही मारुती सुझुकीचीच आहे. खरे तर, मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक इग्निसच्या विक्रीत 1001 टक्क्यांची वार्षिक वाढ (10 पट अधिक) झाली आहे. मारुतीने सप्टेंबर 2021 मध्ये इग्निसच्या केवळ 522 युनिट्सची विक्री केली होती, तर सप्टेंबर 2022 मध्ये 5,750 युनिट्सची विक्री केली आहे.
मारुती सुझुकी इग्निसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स -
इग्निसमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन येते, हे इंजिन 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्स ऑप्शन सह येते. फीचरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये डीआरएल सोबतच एलईडी हेडलॅम्प, अलॉय व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी असलेले 7.0 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटो एसी आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्या सारखे फीचर्स आहेत.
मारुती सुझुकी इग्निसची किंमत -
मारुती इग्निसची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.72 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) जाते. ही कार एकूण 7 व्हेरिअंट्समध्ये येते. सिग्मा हे इग्निसचे बेस मॉडेल आहे. जे 5.35 लाख रुपयांत (एक्स शोरूम) येते. तसेच अल्फा एएमटी हे टॉप व्हेरिअंट आहे, जे 7.72 लाख रुपयांत (एक्स शोरूम) येते.