Best Mileage Scooters : शानदार मायलेज देतील 'या' पाच स्कूटर्स, टाकी एकदा फूल करा आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:06 PM2022-12-09T17:06:54+5:302022-12-09T17:08:07+5:30

Best Mileage Scooters : जर तुमची स्कूटर जास्त मायलेज देत असेल तर ती चालवण्याचा खर्च कमी होईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्वात जास्त मायलेज देणार्‍या 5 स्कूटर्सबद्दल सांगत आहोत.

top five best mileage scooters in india | Best Mileage Scooters : शानदार मायलेज देतील 'या' पाच स्कूटर्स, टाकी एकदा फूल करा आणि...

Best Mileage Scooters : शानदार मायलेज देतील 'या' पाच स्कूटर्स, टाकी एकदा फूल करा आणि...

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून जास्त फीचर्स आणि मायलेज देणारी वाहने पसंत केली जात आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त मायलेज देणारी स्कूटर कोणती? हे माहित असले पाहिजे. कारण, पेट्रोलचे दर खूप वाढले आहेत. अशा परिस्थितीत जर तुमची स्कूटर जास्त मायलेज देत असेल तर ती चालवण्याचा खर्च कमी होईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्वात जास्त मायलेज देणार्‍या 5 स्कूटर्सबद्दल सांगत आहोत.

1. YAMAHA FASCINO HYBRID 125
यामाहाची Fascino 125 मध्ये माइल्ड-हायब्रिड सेटअप येतो. हे जवळपास 68 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. स्कूटर 125cc एअर-कूल्ड इंजिनसह येते, जी 8.2PS/10.3Nm पॉवर आउटपुट देते. Fascino 125 ची किंमत 76,600 ते 87,830 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

2. YAMAHA RAYZR 125
यामाहाच्या या स्पोर्टियर स्कूटरमध्ये माइल्ड-हायब्रिडसह 125cc इंजिन मिळते. हे सुमारे 68 kmpl चे मायलेज देखील देऊ शकते. या स्कूटरची किंमत 80,730 रुपयांवरून 90,130 रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. ही स्कूटर पाच व्हेरिएंटमध्ये येते.

3. SUZUKI ACCESS 125
सुझुकी अॅक्सेस 125 (Suzuki Access 125) मध्ये 124cc, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन येते, जे जवळपास 64 kmpl मायलेज देऊ शकते. याची किंमत 77,600 रुपये ते 87,200 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 5 लीटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे.

4. TVS JUPITER
टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) मध्ये 110cc इंजिनसह येते. हे इंजिन इंटेलिगो आयडल स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह येते. ही स्कूटर 62 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरची किंमत सुमारे 70 हजार रुपये ते सुमारे 85 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.

5. HONDA ACTIVA 6G
होंडा अॅक्टिव्हा  6G (Honda Activa 6G)मध्ये 109.51cc,सिंगल-सिलिंडर, फ्यूल-इंजेक्टेड इंजिनसह येते. हे 60 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. या स्कूटरची किंमत 73,086 रुपये ते 76,587 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Web Title: top five best mileage scooters in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.