देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 25 Cars; 'या' कारने WagonR ला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:11 PM2022-09-21T13:11:08+5:302022-09-21T13:11:51+5:30
top selling cars in india : विक्रीच्या बाबतीत ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले आणि पहिले स्थान गाठले
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी आहे. ऑगस्ट 2022 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या कार पहिल्या 3 स्थानांवर आहेत. ऑगस्टमध्ये बलेनोची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्याचवेळी, ऑगस्टमध्ये विकल्या गेलेल्या टॉप 25 कारमध्ये मारुती सुझुकीच्या 11 मॉडेल्स, ह्युंदाईच्या 4 मॉडेल्स, टाटा, महिंद्रा आणि कियाच्या प्रत्येकी 3 मॉडेल आणि टोयोटाच्या 1 मॉडेलचा समावेश आहे.
विक्रीच्या बाबतीत ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले आणि पहिले स्थान गाठले. 18,418 युनिट्सची विक्री होऊन बलेनो सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. मारुती सुझुकी वॅगनआर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, जी जुलैमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार होती. दरम्यान, देशात विकल्या गेलेल्या टॉप 25 कारची लिस्ट जाणून घ्या...
देशातील सर्वाधिक जास्त विकल्या जाणाऱ्या 25 कार (ऑगस्ट 2022 मधील आकडेवारीनुसार)
1- मारुती सुझुकी बलेनो- 18,418 युनिट्स विकल्या
2- मारुती सुझुकी वॅगनआर - 18,398 युनिट्स विकल्या
3- मारुती सुझुकी विटारा ब्रेझा - 15,193 युनिट्स विकल्या
4- टाटा नेक्सॉन - 15,085 युनिट्स विकल्या
5- मारुती सुझुकी अल्टो- 14,388 युनिट्स विकल्या
6- ह्युंदाई क्रेटा- 12,577 युनिट्स विकल्या
7- टाटा पंच - 12,006 युनिट्स विकल्या
8- मारुती सुझुकी ईको- 11,999 युनिट्स विकल्या
9- मारुती सुझुकी डिझायर- 11,868 युनिट्स विकल्या
10- मारुती सुझुकी स्विफ्ट- 11,275 युनिट्स विकल्या
11- ह्युंदाई व्हेन्यू - 11,240 युनिट्स विकल्या
12- मारुती सुझुकी एर्टिगा - 9,314 युनिट्स विकल्या
13- ह्युंदाई ग्रँड आय 10 - 9,274 युनिट्स विकल्या
14- किआ सेल्टोस - 8,652 युनिट्स विकल्या
15- महिंद्रा बोलेरो - 8,246 युनिट्स विकल्या
16- किआ सोनेट - 7,838 युनिट्स विकल्या
17- मारुती सुझुकी एस-प्रेसो - 7,774 युनिट्स विकल्या
18- ह्युंदाई आय 20 ईलाइट - 7,558 युनिट्स विकल्या
19- टाटा टियागो- 7,209 युनिट्स विकल्या
20- महिंद्रा स्कॉर्पिओ- 7,056 युनिट्स विकल्या
21- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा - 6,036 युनिट्स विकल्या
22- महिंद्रा XUV700- 6,010 युनिट्स विकल्या
23- मारुती सुझुकी सेलेरियो - 5,852 युनिट्स विकल्या
24- मारुती सुझुकी इग्निस - 5,746 युनिट्स विकल्या
25- किआ केरेन्स - 5,558 युनिट्स विकल्या