स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:15 AM2022-08-05T11:15:11+5:302022-08-05T11:15:23+5:30

टॉर्क मोटर्सची ही बाईक दोन प्रकारात येते. टॉर्क क्रेटॉस आणि टॉर्क क्रेटॉस आर (Tork Kratos R) यांना चांगली रेंज आहे.

Tork Kratos R electric motorcycle delivered with innovative packaging: Watch Video | स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला

स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला

googlenewsNext

पुण्यातील ईलेक्ट्रीक बाईक कंपनी टॉर्क मोटर्स (Tork Motors) ने काही दिवसांपासून ईलेक्ट्रीक बाईकची डिलिव्हरी सुरु केली आहे. यासाठी मालकाने भन्नाट आयडिया वापरली आहे, लहान मुलांच्या रिमोटच्या कार जशा एका आकर्षक बॉक्समधून येतात तशा पद्धतीने क्रेटॉस बाईकची डिलिव्हरी करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष यातील बाईककडे जात होते. 

टॉर्क मोटर्सची ही बाईक दोन प्रकारात येते. टॉर्क क्रेटॉस आणि टॉर्क क्रेटॉस आर (Tork Kratos R) यांना चांगली रेंज आहे. पुण्यात या बाईकची डिलिव्हरी सुरु झाली आहे. याचा व्हिडीओ कंपनीने यूट्यूबवर पोस्ट केला आहे. यामध्ये कंपनीचे मालक कपिल शेळके स्वत: बाईकची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी गेले होते. 
टॉर्क मोटर्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, टॉर्क मोटर्सचे सीईओ कपिल शेळके त्यांच्या घरातून बाहेर पडतात. त्यांच्या कारच्या मागील बाजूस टॉर्क क्रॅटोसने भरलेले पार्सल बॉक्स कॅरिअर जोडतात आणि ग्राहकाच्या घरी पोहोचतात. बाईकच्या बॉक्सवर त्याची वैशिष्ट्येही सांगण्यात आली होती. पुण्यात टॉर्क क्रॅटोस आणि क्रॅटोस आरच्या 20 युनिट्स वितरित करण्यात आल्या आहेत. 

Tork Motors ने Kratos आणि Kratos R हे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत १.०२ लाख आहे.  ही किंमत दिल्ली एक्सशोरुम आहे, यामध्ये सबसिडीदेखील जोडलेली आहे. Tork Motors ने २६ जानेवारीपासूनच या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. पुण्यात या बाईकची किंमत १.०७ लाखांपासून सुरु होते.

बॅटरी आणि रेंज...
मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ही मोटरसायकल १०० किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. यामध्ये एक्सियल फ्लक्स टाइप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. चार सेकंदांत ही मोटरसायकल 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 kmph आहे. 
फास्ट चार्जिंग सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी देण्यात आले आहेत. 

Web Title: Tork Kratos R electric motorcycle delivered with innovative packaging: Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.