Bullet पेक्षा कमी किमतीत लाँच झाली पॉवरफुल बाईक, फीचर्सही आहेत शानदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 02:01 PM2023-08-12T14:01:40+5:302023-08-12T14:02:35+5:30

मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींकडे ग्राहकांचा वाढता कल पाहून आता अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

Tork Kratos-R Urban launched at Rs 1.67 lakh | Bullet पेक्षा कमी किमतीत लाँच झाली पॉवरफुल बाईक, फीचर्सही आहेत शानदार!

Bullet पेक्षा कमी किमतीत लाँच झाली पॉवरफुल बाईक, फीचर्सही आहेत शानदार!

googlenewsNext

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटोमार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात इलेक्ट्रिक बाईक्स पूर्णपणे पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्सशी स्पर्धा करतील. आता अशा अनेक इलेक्ट्रिक बाईक्स मार्केटमध्ये विकल्या जात आहेत, ज्या केवळ पैशांची बचत करत नाहीत तर पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत पेट्रोल बाईक्सपेक्षाही चांगल्या आहेत. मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींकडे ग्राहकांचा वाढता कल पाहून आता अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक टॉर्क मोटर्सने (Tork Motors) टॉर्क क्रॅटोस आर अर्बन (Tork Kratos R Urban) इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. कंपनीने ही ई-बाईक स्ट्रीकी रेड, ओशनिक ब्लू आणि मिडनाईट ब्लू या तीन कलरमध्ये आणली आहे. क्रॅटोस आर अर्बन बाईक हे टॉर्क मोटर्सने यापूर्वी लाँच केलेल्या क्रॅटोस ई-बाईकचे परवडणारे मॉडेल आहे. या बाईकची किंमत 1.67 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक आपल्या टॉप मॉडेलपेक्षा जवळपास 20,000 रुपयांनी स्वस्त आहे.

टॉर्क क्रॅटोस आर अर्बन बाईक कंपनीने विशेषतः शहरांमध्ये वापरण्याच्या उद्देशाने बनवली आहे. या बाईकमध्ये एक्सियल फ्लक्स मोटर देण्यात आली आहे, जी 12 बीएचपी पॉवर आणि 38 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दरम्यान, ही बाईक 350 सीसी बुलेटपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. रॉयल एनफील्ड बुलेटचे इंजिन 19 बीएचपीची कमाल पॉवर आणि 27  एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकला पॉवर देण्यासाठी कंपनीने 4 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी पॅक वापरली आहे. बाईकला फक्त सिटी मोड मिळतो, ज्यामध्ये ती 70 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते. तसेच, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 100 किलोमीटरपर्यंत चालवता येते.

काय आहे फीचर्स?
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये मॅप नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हेईकल लोकेटर, अँटी थेफ्ट सिस्टम, जिओफेन्सिंग, चार्जिंग पॉइंट लोकेशन, ओटीए अपडेट, राइड अॅनालिटिक्स, गाईड लाइट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनी 15 ऑगस्ट 2023 पासून टॉर्क क्रॅटोस आर अर्बनची बुकिंग सुरू करणार आहे. ही बाईक बुक करण्यासाठी 999 रुपये टोकन रक्कम भरावी लागेल.

Web Title: Tork Kratos-R Urban launched at Rs 1.67 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.