Tork KRATOS X : पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसने X ला दाखविले; जास्त रेंज, इन्फोटेन्मेंट सिस्टिम...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:47 PM2023-01-13T12:47:42+5:302023-01-13T12:48:07+5:30

Tork KRATOS X Electric Motorcycle At Auto Expo 2023: पुण्याची स्टार्टअप कंपनी  टॉर्क मोटर्सने खास ईलेक्ट्रीक मोटरसाय़कल दाखविली.

Tork KRATOS X : Pune's Tork Kratos introduced the X; More range, infotainment system... | Tork KRATOS X : पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसने X ला दाखविले; जास्त रेंज, इन्फोटेन्मेंट सिस्टिम...

Tork KRATOS X : पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसने X ला दाखविले; जास्त रेंज, इन्फोटेन्मेंट सिस्टिम...

googlenewsNext

ऑटो एक्सपो 2023 मध्ये इलेक्ट्रीक कारनंतर आजचा दिवस इलेक्ट्रीक स्कूटरचा ठरणार आहे. दोन दिवस कार कंपन्यांनी गाजविले. जवळपास ७०० किमीपर्यंत रेंज असलेल्या कार लाँच झाल्या आहेत. आता टॉर्क क्रेटॉसने इलेक्ट्रीक मोटरसायकल प्रदर्शित केली आहे. 

पुण्याची स्टार्टअप कंपनी  टॉर्क मोटर्सने खास ईलेक्ट्रीक मोटरसाय़कल दाखविली. या KRATOS X चे स्टायलिश डिझाईन, परफॉर्मन्स आणि कंफर्टसोबतच ही मोटरसायकल लवकरच बाजारात लाँच करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

टॉर्क मोटर्स येत्या एप्रिल-जूनमध्ये KRATOS X साठी बुकिंग सुरु करणार आहे. या मोटरसायकलमध्ये चांगली पॉवरट्रेन असेल, म्हणजेच Kratos R पेक्षा अधिक शक्तिशाली बॅटरी, जास्त शक्ती आणि टॉर्क मोटरसायकलला वेग आणि कार्यक्षमता वाढवेल. याचबरोबर टॉर्क क्रेटॉसमध्ये इंफोटेन्मेंट सिस्टिमदेखील असेल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या मोटारसायकलची माहिती मिळेल. सुरक्षा वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सध्या, टॉर्क मोटर्स पुणे, पाटणा, सुरत आणि हैदराबाद येथे सेवा देत आहे. भविष्यात ती आणखी काही शहरांत वाढविणार असल्याचे टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ कपिल शेळके यांनी सांगितले. आजपासून ऑटो एक्स्पो सामान्यांसाठी खुला झाला आहे.

Web Title: Tork KRATOS X : Pune's Tork Kratos introduced the X; More range, infotainment system...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.